-
गुरुचरण सिंग नऊ दिवसांपासून बेपत्ता आहे. टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये सोढीची भूमिका करणारा गुरुचरण २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे.
-
या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. आयपीसीच्या कलम ३६५ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यात हे अपहरणाचं प्रकरण असल्याचा संशय आहे.
-
अभिनेता २२ एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबई जाण्यासाठी घरातून निघाला, पण तो विमानतळावर गेलाच नाही. यानंतर कुटुंबातील कोणाचाही गुरुचरणशी संपर्क होऊ शकला नाही. तो मुंबईला गेला नाही हे कळाल्यावर त्याच्या वडिलांनी २५ एप्रिल रोजी दिल्लीतील पालम पोलीस स्टेशनमध्ये तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
-
गुरुचरण सिंगचा फोन २४ एप्रिलपर्यंत सुरू होता, पण नंतर तो बंद झाला आहे. पोलिसांनी फोनमधील आर्थिक व्यवहार तपासल्या असता काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या.
-
गुरुचरण सिंग लवकरच लग्न करणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, इंडियन एक्सप्रेसने गुरुचरण सिंग यांच्या कुटुंबीयांशी खास बातचीत केली. ज्यात त्यांनी ही गोष्ट नाकारली होती. तसेच अशा बातम्या कुठून येतात हे माहीत नाही. तसेच गुरुचरण सिंग आर्थिक संकटात असल्याची बातमी समोर आली होती.
-
गुरुचरण सिंग यांना ‘तारक मेहता…’ या टीव्ही मालिकेतून लोकप्रियता मिळाली. यामध्ये त्याने रोशन सिंग सोढीची भूमिका साकारली आणि त्याचं नशीब पालटलं.
-
गुरुचरण सिंग आठ दिवसानंतरही अजून सापडलेला नाही, त्यामुळे चाहते व कुटुंबीय चिंतेत आहेत.
-
गुरुचरण सिंग लवकरच सापडतील, त्यांचं मानसिक आरोग्य उत्तम होतं, असं अभिनेता समय शाहने म्हटलं आहे. (फोटो – समय शाह)
-
(सर्व फोटो – गुरुचरण सिंग इन्स्टाग्राम)

Ratnagiri Accident : रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ अपघात, मुंबईवरुन निघालेली लक्झरी बस जळून खाक