-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांना ओळखलं जातं.
-
आजवर त्यांनी अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
-
ऐश्वर्या नारकर त्यांच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात.
-
सोशल मीडियाच्या माध्यमांतून त्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असतात.
-
अभिनेत्रीच्या कपाळावर एक खूण आहे. याबद्दल त्यांच्या एका चाहत्याने त्यांना प्रश्न विचारला आहे.
-
ऐश्वर्या नारकरांच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने “तुमच्या कपाळावर कसली खूण आहे? शूटिंग करताना काही घडलं होतं का?” अशी कमेंट केली आहे.
-
यावर अभिनेत्रीने उत्तर देत ही खूण नेमकी कसली आहे याबद्दल खुलासा केला आहे.
-
‘Its a birth Mark’ असं उत्तर देत ऐश्वर्या नारकरांनी त्यांच्या कपाळावर जन्मखूण असल्याचं स्पष्ट केलं आहे.
-
दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत रुपाली हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्राम )
Photos : “कपाळावर कसली खूण आहे?” चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या…
ऐश्वर्या नारकरांच्या कपाळावर दिसणारी ‘ती’ खूण कसली आहे? नेटकऱ्याला उत्तर देत म्हणाल्या…
Web Title: Aishwarya narkar revealed about her forehead mark in comment section sva 00