-
अभिनेते मिथुन चक्रवर्ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. तसेच मिथुन यांच्या कुटुंबातील व्यक्तींची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते.
-
त्यांची सून आणि अभिनेत्री मदलसा शर्मा (Madalsa Sharma) एक उत्तम अभिनेत्री आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’मध्ये (Anupama) ती काव्याची भूमिका साकारत आहे.
-
मदलसा शर्माने मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याच्याशी लग्न केले आहे.
-
१० जुलै २०१८ रोजी या दोघांनी आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या साक्षीने विवाह केला. अगदी पारंपारिक पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला.
-
इतकंच नाही तर मदलसा शर्मा हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री शीला शर्मा यांची मुलगी आहे. ८०च्या दशकात शीला यांनी अनेक मालिकांमध्ये प्रमुख भुमिका साकारल्या आहेत.
-
दरम्यान, मदलसा शर्मा विवाहित आहे यावर चाहत्यांचा विश्वासच बसत नाही आहे. तिच्या ग्लॅमरस अंदाजाचे लाखों चाहते आहे.
-
‘अनुपमा’ मालिकेत खलनायिकेची भुमिका साकारणारी मदलसा तिच्या वैयक्तिक आयुष्यातही तितकीच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
-
या मालिकेत मदलसा ‘काव्या’ हे पात्र साकारत असून ही भुमिका ती उत्तमरित्या बजावत आहे.
-
अनेकदा ती सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते. तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते घायाळ होतात. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”