-
‘बिग बॉस मराठी -४’ या कार्यक्रमात अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे एकत्र सहभागी झाले होते.
-
या शोमध्ये प्रसाद-अमृता या दोघांमध्ये घट्ट मैत्री होऊन पुढे, या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्यावर्षी या लोकप्रिय जोडीने लग्नगाठ बांधली.
-
अभिनेत्री अमृता देशमुखने नुकतीच तिची पहिली मंगळागौर साजरी केली.
-
मंगळागौरीचे सुंदर फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
नऊवारी साडी, भरजरी दागिने, नाकात नथ असा रॉयल लूक अभिनेत्रीने मंगळागौरीच्या दिवशी केला होता.
-
या सगळ्यात अमृताच्या मंगळसूत्राने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं.
-
अमृताच्या सुंदर अन् नाजूक अशा मंगळसूत्राचं सध्या सर्वजण कौतुक करत आहेत.
-
या मराठमोळ्या लूकमध्ये अभिनेत्री एकदम शोभून दिसत आहे.
-
दरम्यान, पहिल्या मंगळागौरीचे फोटो पाहून नेटकरी प्रसाद-अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : Captured by : @ krafty.lightsb )

“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघिणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला