-
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता मेस्त्री ही सोशल मीडियावर ग्लो गर्ल या नावाने सक्रिय आहे.
-
अंकिता इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकत इन्फ्लुएन्सर म्हणून प्रसिद्ध झाली.
-
झी मराठी वाहिनीवरील ‘जाऊबाई जोरात’ या कार्यक्रमातून ती प्रसिद्धीझोतात आली.
-
‘नखरेवाली’ या गाण्यामध्ये काम करून अंकिता अधिक लोकप्रिय झाली आणि लोकांच्या मनात तिने घर केले.
-
अंकिताने या लूकसाठी पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
अंकिताने परिधान केलेल्या साडीला सोनेरी रंगाची डिझाईन असलेली किनार आहे.
-
कानात घातलेले झुमके, हातातील अंगठी आणि गळ्यातील भव्य हारामुळे अंकिताच्या लूकला एक वेगळेच सौंदर्य लाभले आहे.
-
माथ्यावर लावलेल्या टिकलीमुळे अंकिताचा मराठमोळा अंदाज दिसून येत आहे.
-
अंकिताच्या मागे असलेल्या फुलांच्या सजावटीमुळे तिचे फोटो अधिकच सुंदर दिसत आहेत.
(सर्व फोटो सौजन्य ; अंकिता मेस्त्री / इंस्टाग्राम )