-
The Indrani Mukerjea Story: Buried Truth
हा माहितीपट भारतातील सर्वात गाजलेल्या हत्या प्रकरणांपैकी एक, शीना बोरा प्रकरणावर आधारित आहे. इंद्राणी मुखर्जी आणि तिच्या कुटुंबातील गुंतागुंतीच्या नात्याबद्दल यात सांगण्यात आलं आहे. (फोटो स्रोत: Netflix) -
House of Secrets: The Burari Deaths दिल्लीतील बुरारी येथील धक्कादायक घटनेवर हा माहितीपट आधारित आहे. एकाच कुटुंबातील 11 जणांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरला होता. या माहितीपटात या मृत्यूंमागील मानसिक आणि कौटुंबिक पैलूंचा सखोल वेध घेण्यात आला आहे. (फोटो स्रोत: Netflix)
-
Curry & Cyanide – The Jolly Joseph Case
केरळमधील जॉली जोसेफचे प्रकरण, ज्यात त्याने सायनाईड मिसळून आपल्या कुटुंबातील अनेक सदस्यांची हत्या केली, ती भयपटापेक्षा कमी नाही. हा माहितीपट या भयंकर गुन्ह्यांमागील हेतू आणि त्याचे परिणाम उलगडून दाखवतो. (फोटो स्रोत: Netflix) -
इंडियन प्रिडेटर: द डायरी ऑफ अ सीरियल किलर
ही मालिका भारतातील सर्वात कुख्यात सिरीयल किलर्स आणि त्यांनी केलेल्या भयंकर गुन्ह्यांवर आधारित आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये एक नवीन केस आणि नवीन रहस्यमय कथा आहे. त्यातून तुम्हाला गुन्हेगारांची मानसिकता आणि त्यांच्या भयानक कृत्यांची झलक मिळते. (फोटो स्रोत: Netflix) -
The Disappearance Of Madeleine McCann
या माहितीपटात तीन वर्षांच्या मॅडलिन मॅककॅनच्या रहस्यमयपणे बेपत्ता झाल्याची कथा सांगितली आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये या प्रकरणातील गुंतागुंत आणि आंतरराष्ट्रीय तपासाबद्दल सांगण्यात आलं आहे. (फोटो स्रोत: Netflix) -
Cold Case: Who Killed JonBenét Ramsey
ही डॉक्युमेंटरी सहा वर्षीय जोनबेनेट रॅमसेच्या हत्येवर आधारित आहे. या प्रकरणाने अमेरिका हादरली होती. (फोटो स्रोत: Netflix) -
What Jennifer Did
हा डॉक्युमेंटरी जेनिफर नावाच्या महिलेची कथा सांगते जी आपला गुन्हा लपवण्यासाठी अत्यंत क्लिष्ट प्लॅन रचते. तिची मानसिकता आणि गुन्हेगारी कथा पाहून तुम्हाला धक्का बसेल. (फोटो स्रोत: Netflix) -
This is the Zodiac Speaking
हा डॉक्युमेंटरी अमेरिकेतील सर्वात धोकादायक केस, Zodiac Killer वर आधारित आहे. झोडियाक किलरने पोलीस आणि मीडियाला आपल्या पत्र आणि कोडद्वारे आव्हान दिले. हा माहितीपट त्याच्या मानसिकतेचा आणि त्याच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करतो.(फोटो स्रोत: Netflix)

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक