-
सध्या नेटफ्लिक्सवर काही वेब सीरिज प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. स्क्विड गेम सारख्या सुपरहिट मालिकेसोबतच 2025 मध्ये रिलीज झालेल्या नवीन के-ड्रामा आणि रोमांचक कथा देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तुम्ही नेटफ्लिक्सवर चांगला कंटेंट शोधत असाल, तर या टॉप 10 वेब सीरिजची यादी जाणून घ्या. (फोटो – स्क्रीनशॉट)
-
स्क्विड गेम
दक्षिण कोरियन वेब सिरीज ‘स्क्विड गेम’ ही एक डिस्टोपियन सर्व्हायव्हल थ्रिलर आहे. या शोमध्ये गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ४५६ लोकांचा समावेश आहे. (फोटो – स्क्रीनशॉट) -
मिसिंग यू
‘मिसिंग यू’ हे एक डिटेक्टिव्ह ड्रामा सीरिज आहे. (फोटो – इन्स्टाग्राम) -
American Primeval
ही एक अमेरिकन वेस्टर्न मिनीसिरीज आहे जी अमेरिकन वेस्टवर विजय मिळवण्याच्या लढाईची आणि उटाह प्रांतातील धर्म आणि संस्कृती यांच्यातील संघर्षाची कथा सांगते. (फोटो – स्क्रीनशॉट) -
The Breakthrough
‘द ब्रेकथ्रू’ हा चित्रपट 2004 मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडातील सत्य घटनांवर आधारित आहे. ही कथा वंशावळीच्या मदतीने सोडवलेल्या १६ वर्षांच्या एका प्रकरणावर आधारित आहे. या मालिकेत गुन्हेगारी आणि रहस्य यांचा उत्कृष्ट मिलाफ पाहायला मिळतो. (फोटो – स्क्रीनशॉट) -
Fake Profile
यात कॅमिला नावाची मुलगी तिच्या प्रिन्स चार्मिंगला डेटिंग ॲपवर भेटते. मात्र, चार महिन्यांनंतर तिला कळते की तिच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीने आपली बनावट ओळख उघड केली होती. ही मालिका रोमान्स आणि थ्रिलचा अप्रतिम संगम आहे. (फोटो – स्क्रीनशॉट) -
Subteran
रोमानियन वेब सिरीज ‘सबटेरन’ ही आयटीमध्ये काम करणाऱ्या एका महिलेची कथा आहे. बुखारेस्टच्या गुन्हेगारांचा बदला घेण्यासाठी ती गुप्तहेर बनते तेव्हा तिचे आयुष्य बदलते. ज्यांना बदला आणि सस्पेन्स आवडतो त्यांच्यासाठी ही मालिका छान आहे. (फोटो – स्क्रीनशॉट) -
दुबई ब्लिंग
‘दुबई ब्लिंग’ हा एक रिॲलिटी शो आहे जो दुबईतील श्रीमंत लोकांच्या ग्लॅमरस जीवनाचे प्रदर्शन करतो. या शोमध्ये खाजगी जेट, भव्य पार्ट्या आणि महागड्या फॅशन शोसह लक्झरी जीवनशैली दाखवण्यात आली आहे. (फोटो – स्क्रीनशॉट) -
Jerry Springer: Fights, Camera, Action
ही एक दोन भागांची सीरिज होस्ट जेरी स्प्रिंगर यांच्या जीवनावर आधारित आहे. (फोटो- स्क्रीनशॉट) -
When the Stars Gossip
स्पेस स्टेशनवर एक स्पेस टूरिस्ट आणि अंतराळवीर यांची भेट त्यांचे आयुष्य कसे बदलते याचे सुंदर चित्रण यात आहे. ही मालिका रोमान्स आणि काल्पनिक गोष्टींनी परिपूर्ण आहे. (फोटो – स्क्रीनशॉट) -
Departure
‘डिपार्चर’ हा एक हाय-ऑक्टेन सस्पेन्स ड्रामा आहे. (फोटो – स्क्रीनशॉट)

Sanjay Raut : “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलीन करायला तयार”, ‘या’ खासदारांचा मोठा दावा; चर्चांना उधाण