-
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
या फोटोंमध्ये सोनालीने गडद पिवळ्या रंगाची रेशमी साडी नेसली असून ती सूर्यप्रकाशासारखी झळाळून दिसत आहे.
-
या लूकला तिने सुंदर झुमके आणि हातातील कड्यांची साथ दिली आहे, जी पारंपरिक सौंदर्याला अधोरेखित करते.
-
पार्श्वभूमीला ऑरेंज आणि लाल रंगाचा टोन असून तो तिच्या लूकला अधिक उठावदार बनवतो.
-
“Everywhere you go… take the sunshine with you ” असे कॅप्शन देत तिने आपल्या उत्साही व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडवलं.
-
सोनालीच्या या स्टाइलिश लूकला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.
-
ती सध्या अनेक प्रोजेक्ट्स आणि टेलिव्हिजन शोमध्ये झळकत असून तिचं सौंदर्य आणि आत्मविश्वास नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली बेंद्रे/ इंस्टाग्राम)

महिलांनो, फ्रिजमध्ये एकदा नक्की ठेवा मिठाने भरलेली वाटी; तुमची पावसाळ्यातील ‘ही’ मोठी समस्या होईल कायमची दूर, पाहा कमाल