-
अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद हिचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. एकेकाळी बालकलाकार म्हणून गाजलेली श्वेता आता ओटीटीच्या माध्यमातून कमबॅक करत आहे.
-
. वयाच्या केवळ १७व्या वर्षीच तिने राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता. ‘मकडी’ या चित्रपटातील भूमिकेमुळे तिच्या अभिनयाचं कौतुक झालं.
-
बालकलाकार म्हणून यश मिळवलेल्या श्वेताने नंतर अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांतही काम केलं.
-
तिचं करिअर चांगलं सुरू असतानाच एक वादग्रस्त स्कँडल तिच्या आयुष्यात आलं आणि अचानक ती प्रकाशझोतातून दूर गेली.
-
या प्रकरणामुळे तिच्या अभिनय कारकिर्दीला मोठा फटका बसला. काही काळासाठी तिने माध्यमांपासून दूर राहणं पसंत केलं.
-
मात्र, काही वर्षांनी तिने पुन्हा नव्या आत्मविश्वासानं पुनरागमन केलं. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘क्रिमिनल जस्टीस’ या वेब सीरिजमधून ती पुन्हा प्रेक्षकांसमोर आली.
-
श्वेताच्या अभिनयाला पुन्हा एकदा दाद मिळू लागली आहे. तिच्या परताव्यावर सोशल मीडियावरही चांगला प्रतिसाद दिसून येतो आहे.
-
एक काळ अडचणींचा सामना करून, आज श्वेता बसू प्रसाद पुन्हा नव्या जोमाने काम करत आहे आणि स्वतःचं स्थान पुन्हा मिळवते आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता बासू प्रसाद/ इंस्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल