-
दमदार ओपनिंगने मिळवलेले यश मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’नं प्रदर्शनाच्या पहिल्याच वीकेंडमध्ये ८३ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली. नव्या जोडीचा सिनेमा असूनही एवढं यश मिळणं ही मोठी बाब आहे. बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग मिळवलेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण, हा चित्रपट खरोखरच पाहण्याजोगा आहे का? खाली दिलेली सात कारणं ‘सैयारा’ का पाहावा याचं उत्तर देतील.
-
फ्रेश चेहऱ्यांची जोडी
अहान पांडे आणि अनित पड्डा या नवोदित कलाकारांनी आपल्या सादरीकरणानं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. त्यांच्या केमिस्ट्रीचं कौतुक सोशल मीडियावरही पाहायला मिळतंय. -
संगीताची खास जादू
‘सैयारा’ची गाणी सध्या प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. प्रेमभऱ्या संगीतातून चित्रपटातल्या भावना आणखी ठळकपणे समोर येतात. संगीत हा या सिनेमाचा आत्माच आहे. -
भावनिक प्रेमकथा
चित्रपटाची कथा प्रेम, वेदना, संघर्ष व समर्पण यांवर आधारलेली आहे. क्लासिक प्रेमकथेच्या चौकटीत राहूनही ती नव्या पद्धतीनं मांडली गेली आहे. -
देखणं छायाचित्रण आणि लोकेशन्स
चित्रपटातील लोकेशन्स आणि व्हिज्युअल सादरीकरण डोळ्यांना सुखावणारं आहे. सिनेमॅटोग्राफीमुळे प्रत्येक दृश्य अधिक प्रभावी वाटतं. -
मोहित सुरीचं भावनिक दिग्दर्शन
‘आशिकी 2’ आणि ‘एक व्हीलन’सारख्या सिनेमांनंतर मोहित सुरीनं पुन्हा एकदा प्रेमकथेच्या दुनियेत रसिकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी ठरतोय. -
प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा प्रतिसाद
चित्रपटाला केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर सोशल मीडियावरही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. अनेकांनी हा सिनेमा पुन्हा पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. -
प्रेमी युगलांसाठी परफेक्ट सिनेमा
‘सैयारा’ हा सिनेमा प्रेमात असलेल्या किंवा प्रेम अनुभवणाऱ्या प्रत्येकासाठी खास आहे. सुंदर संगीत, भावनिक कथा आणि उत्कट अभिनय यांमुळे हा सिनेमा नक्कीच पाहण्यासारखा आहे. -
(सर्व फोटो सौजन्य : अहान पांडे आणि अनित पड्डा/ इंस्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल