-
टीव्हीवरच्या साँस-बहू मालिकांमधून प्रेम, संघर्ष व भावना यांचे गहिरे रंग निर्माण करणाऱ्या एकता कपूर यांच्या काही जोडीदार जोड्यांनी आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. चला पाहूया त्या पाच अजरामर प्रेमकथा, ज्यातील जोड्यांनी भारतीय टीव्हीवर प्रेमाची व्याख्या बदलून टाकली.
-
अनुराग – प्रेरणा (कसौटी जिंदगी की) एकमेकांपासून दूर जावं लागलं, आयुष्य बदललं; पण प्रेम तसंच होतं. अनुराग आणि प्रेरणाचं प्रेम म्हणजे काळजाला भिडणारी शांत सवय.
-
तुलसी – मिहीर (क्योंकि साँस भी कभी बहू थी) तुलसी आणि मिहीर या जोडीने घराघरात संस्कार आणि समतेचं उदाहरण ठेवलं. कधी गहिवर, तर कधी संघर्ष; पण नातं तसंच राहिलं.
-
सुझल – काशिश (कहीं तो होगा) ही जोडी म्हणजे रुमॅंटिक थ्रिलरचा उत्तम नमुना. गैरसमज, वेदना आणि तरीही प्रेम… ही जोडी मनाला भिडते.
-
इशिता – रमण (ये है मोहब्बतें) भांडण, वेगवेगळं पार्श्वभूमी; पण अपार प्रेम. इशिता ही एक सुसंस्कृत, डॉक्टर व समजूतदार आई, तर रमण एक ताठर स्वभावाचा कॉर्पोरेट बिझनेसमन. सुरुवातीला तणाव, गैरसमज; पण मुलीच्या प्रेमातून जुळलेलं त्यांचं नातं प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणायचं. “ये है मोहब्बतें” ही मालिका आणि ही जोडी अजूनही अनेकांच्या मनात कायम आहे.
-
राम – प्रिया (बडे अच्छे लगते हैं) प्रौढ वयातील दोन अपरिपूर्ण व्यक्ती जेव्हा प्रेमात पडतात, तेव्हा आयुष्य खऱ्या अर्थानं सुंदर होतं. राम आणि प्रिया हे त्याचं सजीव उदाहरण.
-
या सगळ्या जोड्या आजही टीव्ही प्रेक्षकांच्या आठवणीत जशाच्या तशा कोरल्या गेल्या आहेत. एकता कपूर यांची खास लेखनशैली, पात्रांचा भावनिक गाभा आणि योग्य केमिस्ट्री यांमुळे या प्रेमकथा केवळ पडद्यावर न राहता, अनेकांच्या जीवनातही स्थिरावल्या.

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव