-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता निमिश कुलकर्णी घराघरांत लोकप्रिय झाला.
-
निमिशने अलीकडेच त्याच्या सगळ्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. अभिनेत्याचा साखरपुडा नुकताच पार पडला असून, आता निमिश लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
अभिनेत्याने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्याच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
-
निमिश कुलकर्णीची होणारी पत्नी सुद्धा मराठी मनोरंजनसृष्टीत सक्रिय आहे.
-
मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून ती काम पाहते. तिचं नाव आहे कोमल भास्कर.
-
निमिश कुलकर्णीची होणारी पत्नी ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेची क्रिएटिव्ह हेड आहे. यापूर्वी तिने ‘दार उघड बये’ या मालिकेची देखील क्रिएटिव्ह हेड म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
-
साखरपुड्याचे फोटो शेअर करत कोमल लिहिते, “एक नवीन सुरुवात…आता आयुष्यभर साथ…” याशिवाय कॅप्शनमध्ये तिने साखरपुड्याची तारीख देखील नमूद केली आहे. निमिश व कोमल यांचा साखरपुडा २५ जुलै २०२५ रोजी पार पडला.
-
निमिश कुलकर्णीने साखरपुड्यात डिझायनर शेरवानी घातली होती. तर, त्याच्या भावी पत्नीने जांभळ्या रंगाची सुंदर साडी साखरपुड्यात नेसली होती. दोघेही पारंपरिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होते.
-
दरम्यान, निमिशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, त्याने हास्यजत्रेसह मालिका व चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. सई ताम्हणकरची मुख्य भूमिका असलेल्या ‘अग्नी’ या बॉलीवूड सिनेमात सुद्धा तो झळकला आहे. सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोचा दिग्दर्शक म्हणून निमिश जबाबदारी सांभाळत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : निमिश कुलकर्णी इन्स्टाग्राम व @ miss_canon_21 )

Friendship Day 2025 : ‘फ्रेंडशिप डे’निमित्त दोस्तांना पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह WhatsApp, Facebook, Instagram वर पोहोचवा मैत्रीतील गोडवा