-
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने तिचे खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच मोहक दिसते आहे.
-
चिलिंग इन व्हिएतनाम असं कॅप्शन देत प्रियदर्शनीने हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. मरुन रंगाची साडी, त्यावर पांढऱ्या रंगाचं डिझाईन हे तिच्या सौंदर्यात भर घालतं आहे.
-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये प्रियदर्शनी विविध प्रकारच्या स्कीट्समध्ये काम करते. शिवाली, अवली च्या स्कीटला प्रेक्षकांची खास पसंती लाभली आहे. (सर्व फोटो सौजन्य-प्रियदर्शनी इंदलकर, इन्स्टाग्राम पेज)
-
प्रियदर्शनीचा खास अंदाज चर्चेत आला आहे. या फोटोंवर एका चाहत्याने कमेंट केली आहे. मी तुझ्यासाठी पागल झालो आहे आता काय करु. ही कमेंटही चर्चेत आली आहे.
-
प्रियदर्शनी इंदलकरने फुलराणी, नवरदेव बीएससी अॅग्री, या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे प्रियदर्शनी घराघरांत पोहचली आहे. यातल्या तिच्या विविध भूमिका लोकांना आवडतात.
-
प्रियदर्शनी साडीमध्ये खूप सुंदर दिसते. तिचे फोटो ती कायम इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत असते.
-
प्रियदर्शनी इंदलकरने वेब सीरीजमध्येही काम केलं आहे. त्याचंही कौतुक झालं आहे.
-
प्रियदर्शनी इंदलकरने नुकतीच एक पोस्ट केली होती. ज्यात तिने आपण गोगलगाय खाल्ल्याचं म्हटलं होतं.
-
प्रियदर्शिनीला सिनेमांमध्ये नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारायला आवडतात. सध्या ही अभिनेत्री व्हिएतनाम फिरायला गेली आहे. व्हिएतनाममधील विविध जागा, कॅफे, रेस्टॉरंट, तेथील संस्कृती, स्ट्रीट फूड या सगळ्याची झलक अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे.

अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी