-
स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे शर्वरी जोग.
-
मालिकेत तिची ‘मिस इंदौर’ म्हणून ओळख आहे. यात तिच्यासह अभिजीत आमकर हा अभिनेताही मुख्य भूमिकेत आहेत.
-
अभिजीत आणि शर्वरी म्हणजेच अर्णव आणि ईश्वरी यांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.
-
आपल्या अभिनयाने लक्ष वेधून घेणारी शर्वरी सोशल मीडियावरसुद्धा तितकीच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर शर्वरी तिचे अनेक स्टायलिश लुकमधले फोटो शेअर करत असते.
-
अशातच तिने गुलाबी साडीमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
मोकळे केस, गळ्यात सुंदर नेकलेस आणि हलकासा मेकअप असा खास लुक तिने केला आहे.
-
या गुलाबी साडीत शर्वरी जितकी सुंदर दिसत आहे; तितकंच तिचं मनमोहक हास्यही लक्ष वेधून घेत आहे. फोटो : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, शर्वरीने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी