-
मराठमोळी अभिनेत्री सायली पाटीलने अनेक मराठी चित्रपटांमध्ये कमाल अभिनय केला आहे.
-
तिने नागराज मंजुळेंच्या झुंड, घर बंदूक बिर्याणी या चित्रपटांत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
तसेच ‘येक नंबर’ या चित्रपटातली तिची भूमिकाही लक्षवेधी होती.
-
दरम्यान, सायली सोशल मीडियावरही सक्रिय राहते.
-
तिने शेअर केलेलं नवं फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे.
-
या फोटोंमध्ये तिने अस्सलं मराठमोळा श्रृंगार केलाय.
-
कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, केसांत गजरा, गळ्यात मोत्यांचा हार, तिच्या या खास लूकनं साऱ्यांचंच लक्ष वेधलंय.
-
दरम्यान, सायलीने कॅप्शनमधून साडीबद्दल माहिती देताना तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
तिने सांगितलं, “ही सुंदर साडी अभिमानाने परिधान केली.”
-
पुढे तिने लिहिलंय की, “ही साडी पूर्व भारतातील पट्टाचित्र कला व दक्षिण भारतातल्या मंगलगिरी रेशमाच्या मिश्रणातून बनलीय. हे म्हणजे दोन नद्यांच्या संगमासारखंच झालं ना?” दरम्यान, तिच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाईक्स व कमेंट्स करत आहेत. (सर्व फोटो साभार- सायली पाटील इन्स्टाग्राम) हेही पाहा- हत्ती आणि माणसातील भावनिक नात्याचे बंध उलगडणारे ८ चित्रपट

VIDEO: कबूतरखाना बंद झाला पण हे पक्षांना कसं सांगणार? दादरमध्ये कबूतर खान्याजवळ प्रचंड संख्येनं येत कबुतरांनी काय केलं पाहा