-
अभिनेत्री तेजस्विनी पंडित गेल्या काही दिवसांपासून ‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटामुळे चर्चेत होती.
-
अनेकदा अभिनेत्री तिच्या वक्तव्यांमुळेदेखील खूप चर्चेत असते.
-
याबरोबरच, तेजस्विनीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट, फोटोंचीदेखील चर्चा रंगताना दिसते. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठा आहे.
-
आता तेजस्विनीने काही फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने साडी नेसली असल्याचे पाहायला मिळत आहे. मोकळे केस, चेहऱ्यावर गोड हसू, टिकली, बांगड्या यांमुळे ती अत्यंत सुंदर दिसत आहे.
-
हे फोटो शेअर करताना तिने लिहिले, “काही फोटो पोस्ट करायचे राहून गेले होते. मला नटायला फार आवडत नाही. पण, साडीतली मी खूप वेगळी असते.”
-
अभिनेत्रीचे साडीप्रेम तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून वेळोवेळी पाहायला मिळते. याआधीही तिने साडीतले तिचे फोटो अनेकदा शेअर केले आहे. त्यावेळीसुद्धा साडीविषयी तिने प्रेम व्यक्त केल्याचे दिसले होते.
-
चाहतेदेखील तिच्या पोस्टवर कमेंट करत तिचे कौतुक करताना दिसतात.
-
आता ‘येरे येरे पैसा ३’ नंतर आगामी काळात ती कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (सर्व फोटो सौजन्य: तेजस्विनी पंडित इन्स्टाग्राम)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली