-
झी मराठीवरील ‘शिवा’ मालिकेमध्ये लक्ष्मण देसाईची भूमिका करणारा अभिनेत्याने नुकतीच आनंदाची बातमी दिली.
-
अभिनेता सुनील तांबटने नुकतीच बाबा झाल्याची एक खुशखबर देत त्याला मुलगी झाल्याचं सांगितलंय.
-
सुनील आणि त्याची पत्नी प्रतिमा दातारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे.
-
“आमच्या आनंदाचा बॉक्स अखेर उघडला गेलाय” अशी पोस्ट सुनीलने शेअर केली आहे.
-
यासह “आमच्या खऱ्या आयुष्यातील भूमिका बदलल्या असून आम्ही एका गोंडस मुलीचे आई-वडील झालोय”, असंही त्यांनी म्हटलं आहे
-
दरम्यान, या पोस्टखाली सुनीलला ‘शिवा’ मालिकेतील तसंच इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत
-
‘शिवा’ मालिकेआधी सुनील ‘योग योगेश्वर जय शंकर’, ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेतही तो दिसला आहे.
-
झी मराठीवरील ‘शिवा’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
आता सुनील कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची चाहते वाट पाहत आहेत.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग