-
झी मराठीवर नुकतंच ‘चला हवा येऊ द्या’ या गाजलेल्या शोचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
-
या नव्या पर्वात कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधवसह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेसुद्धा आहे.
-
गौरव मोरेसह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निमिश कुलकर्णीसुद्धा ‘चला हवा येऊ द्या २’मध्ये सहभागी झाला आहे.
-
निमिश ‘चला हवा येऊ द्या २’मध्ये अभिनेत्याच्या भूमिकेत नाही, तर दिग्दर्शनाची भूमिका पार पाडत आहे, याबद्दल त्याने स्वत: सांगितलं होतं.
-
‘चला हवा येऊ द्या २’शोमधील दिग्दर्शनातील पदार्पणाबद्दल निमिशने अल्ट्रा मराठी बझशी संवाद साधला होता.
-
यावेळी त्याने ‘चला हवा येऊ द्या २’मध्ये मला दिग्दर्शन या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली आणि मी ती संधी लगेच घेतली असं म्हटलं होतं.
-
तसंच “कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला दिग्दर्शनात रस होता. त्यामुळे यात पुढे जाऊन काहीतरी करायचं हे डोक्यात होतं’ असंही म्हटलं होतं
-
दरम्यान, ‘हास्यजत्रा’मधील विनोदी स्किट्समधून निमिषने प्रेक्षकांना हासवण्याचं काम केलं आहे. त्यानंतर आता तो दिग्दर्शन करत आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
काही दिवसांपूर्वीच निमिशने एक खुशखबर दिली ती म्हणजे त्याच्या साखरपुड्याची. २५ जुलै २०२५ रोजी त्याचा कोमल भास्करबरोबर साखरपुडा पार पडला.

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..