-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय प्रेक्षकांची आवडती मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’ ही मालिका.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली-अर्जुन ही जोडी प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आणि आवडती जोडी आहे.
-
सायली-अर्जुनसह, सायली आणि मधुभाऊ ही बाप-लेकीची जोडीही प्रेक्षकांना तितकीच आवडते.
-
प्रत्यक्ष आयुष्यातही सायली आणि मधुभाऊ म्हणजेच जुई गडकरी आणि नारायण जाधव यांचं बाप-लेकीसारखं नातं आहे.
-
सायली आणि मधुभाऊ यांच्या खास नात्याबद्दल जुईने काही दिवसांपूर्वी तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
-
यावेळी जुई म्हणालेली, “आमच्यात खूप छान मैत्री आहे. मी त्यांच्याबरोबर कोणत्याही गोष्टीवर बोलू शकते.”
-
पुढे ती म्हणालेली, “नारायणमामा कधी बाबा म्हणून ओरडतात; तर कधी मित्र म्हणून गप्पा मारतात, समजून घेतात.”
-
पुढे जुई म्हणते, “सायली-मधुभाऊ यांचं नातं प्रेक्षकांना आवडण्याचं कारणच – आमचं वैयक्तिक नातंसुद्धा तितकं छान आहे.”
-
यानंतर जुई सांगते, “मी सेटवर सगळ्यांना सांगते की, ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनसुद्धा मी त्यांची आवडती मुलगी आहे.” (फोटो : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, सिनेचित्र या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जुईने मधुभाऊंबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं होतं.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”