-
अभिनेता राकेश बापट हा ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
-
या मालिकेतील त्याची एजे उर्फ अभिराम जहागिरदार ही भूमिका प्रचंड गाजली.
-
काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे पाहायला मिळते.
-
राकेश बापटने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे.
-
पोपटी रंगाचा कुर्ता, केसरी रंगाचा शेला, पांढऱ्या रंगाचे धोतर अशा पारंपारिक वेशभूषेत तो दिसत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिनेत्याने हे फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्याने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये त्याच्या हातात सितार दिसत आहे.
-
अभिनेत्याचा हा लूक लक्ष वेधून घेत आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे.
-
अभिनेत्री भूमिजा पाटीलने हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.
-
चाहत्यांनी छान दिसत असल्याच्या अनेक कमेंट केल्या आहेत. दरम्यान, आता अभिनेता आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. (सर्व फोटो सौजन्य:राकेश बापट इन्स्टाग्राम)

Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…