-
महाराष्ट्राचा लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) नेहमीच प्रेक्षकांना हसवत असतो, पण यावेळी या टीमने सेटवर एक वेगळीच धमाल उडवून दिली.
-
दहीहंडीचा उत्साह आणि जल्लोष एकत्र साजरा करताना महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
-
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.
-
या उत्साहात सामील होण्यासाठी हास्यजत्रेच्या टीमने आपल्या शूटिंगच्या सेटवरच एक छोटीशी पण धमाकेदार दहीहंडी आयोजित केली.
-
नेहमीच आपापल्या विनोदी भूमिकांमध्ये दिसणारे प्रियदर्शनी इंदलकर, शिवली परब, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, निखिल बने, मंदार मांडवकर, चेतना भट, ऐशा डे, दत्तू मोरे, नम्रता संभेराव आणि इतर सर्व कलाकार पारंपरिक गोविंदाच्या वेशात थिरकताना दिसले.
-
सेटवरील वातावरण एखाद्या मोठ्या दहीहंडी उत्सवापेक्षा कमी नव्हतं. डीजेच्या गाण्याच्या तालावर सर्व कलाकार नाचत होते.
-
स्वतः प्रभाकर मोरे, श्याम राजपूत, विराज जगताप, वनिता खरात, अरुण कदम आणि रसिक वेंगुर्लेकर यांनी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला आणि एकमेकांचे मनोबल वाढवत होते.
-
दहीहंडी फोडण्याचा मान दत्तू मोरे ने पटकावला. प्रभाकर मोरे येणी घालून दहीहंडी सुरवात केली.
-
या कार्यक्रमाची टीम, लेखक आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला. त्यांनी करून उत्सवाला सुरवात केली.
-
या निमित्ताने संपूर्ण टीम एकत्र येऊन, शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून एकत्र सण साजरा करताना दिसली. त्यांचे हे आनंदी क्षण आणि धमाल मस्ती पाहणे प्रेक्षकांसाठी एक खास पर्वणी होती.
-
दहीकाल्याच्या गाण्यांवर हे कलाकार थिरकले आणि दहीहंडी फोडून आनंद साजरा केला आणि महाराष्ट्राची हस्त्यजत्रा कार्यक्रमाचे नवे सीजन पाहण्याचे आव्हान केले.
-
या सोहळ्याने हे सिद्ध केले की, सोनी मराठी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम केवळ पडद्यावरच नाही, तर पडद्यामागेही एक मोठी आणि आनंदी ‘फॅमिली’ आहे. त्यांचा हा उत्स्फूर्त आनंद आणि एकत्र येण्याचा सोहळा पाहून प्रेक्षकांनीही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
-
हा धमाल आणि मस्तीचा अविस्मरणीय सोहळा प्रेक्षकांनी देखील तितकाच एन्जॉय ककरतील. आणि असेच धमाल महाराष्ट्राची हास्यजत्रा चे पुढील भाग पाहत राहा फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनी मराठी/इन्स्टाग्राम) हेही पाहा : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुंबईत पार पडला गणपती बाप्पाचा आगमन सोहळा

२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…