-
मालिका आणि ‘बिग बॉस मराठी’ या शोमधून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे अक्षय केळकर.
-
‘बिग बॉस’मध्ये असल्यापासून अक्षय केळकरच्या रिलेशनशिपची आणि गर्लफ्रेंडची जोरदार चर्चा होती.
-
अखेर यावर्षी ९ मे रोजी अक्षय गर्लफ्रेंड साधना काकटकरबरोबर विवाहबंधनात अकडला.
-
अक्षय-साधना यांच्या लग्नाचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले.
-
अशातच साधनाने तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
साधनाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये अक्षय आणि ती पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
या फोटोमध्ये साधनाने भगव्या रंगाची साडी परिधान केली आहे, तर अक्षयने धोतर परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
मंगळागौरच्या पूजेच्या वेळी टिपलेले खास क्षण साधनाने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
-
साधनाने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

ठाकरे बंधूंचे सर्व उमेदवार पराभूत, बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि प्रसाद लाड यांचे पॅनेल विजयी