-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) लवकरच ‘दशावतार’ (Dashavatar Marathi Movie) चित्रपटात झळकणार आहे.
-
कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार म्हणजेच ‘दशावतार’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियदर्शिनी कोकणातील वेंगूरला (Vengurla) येथे गेली होती.
-
वेंगूरला येथे प्रियदर्शिनीने ‘कोकणी रानमाणूस’ (Konkani Ranmanus) म्हणजेच प्रसाद गावडेची (Prasad Gawade) भेट घेतली.
-
कोकणातील पर्यटन, इथली खाद्यसंस्कृती, जीवनशैली, शेती याबद्दलची माहिती प्रसाद आपल्या कोकणी रानमाणूस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो.
-
प्रियदर्शिनी म्हणाली, ‘कोकणी रानमाणूस What An Inspiration You Are. खऱ्या अर्थाने निसर्ग जाणणारा आणि जपणारा माणूस. गप्पांमधून खूप काही शिकायला मिळालं. Podcast Soon ! आज खरी राखणदाराची जागा पाहिली. गाऱ्हाणं घालताना पाऊस सुरु झाला. आशीर्वाद मिळाला देवा म्हाराजा ! असाच आमच्या पाठीशी उभा ऱ्हव !’
-
झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट १२ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
या चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर (Subodh Khanolkar) यांनी केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

CJI B R Gavai : लोकांनी निवडून दिलेलं सरकार राज्यपालांच्या मर्जीने चालू शकतं का? सरन्यायाधीश गवई यांचा केंद्र सरकारला सवाल