-
संयमी स्वभाव, बारकावे पकडणारा अभिनय आणि आयुष्याकडे पाहण्याची वेगळी नजर—अक्षय खन्नाचे हेच वैशिष्ट्य आहे. त्याचे शब्द फक्त चित्रपटापुरते मर्यादित नाहीत, तर जगण्याचा धडा देतात. (एक्सप्रेस संग्रहित छायाचित्र)
-
“समजा माझ्याकडे ५०० कोटींचा व्यवसाय आहे, तरी लोक विचारतात ‘तू खरोखर यशस्वी आहेस का?’” अक्षयचा हा प्रश्न मनाला थेट भिडतो. आपण यशाची मोजपट्टी नेहमी इतकी उंच का धरतो? (एक्स्प्रेस संग्रहण फोटो)
-
“मी टाटा, अंबानी किंवा अझीम प्रेमजी झालो नाही, म्हणजे मी अपयशी?” त्याचा हा विचार समाजाच्या साचलेल्या कल्पनांना आव्हान देतो. यश फक्त काही नावांशी जोडलेलं का असावं? (एक्स्प्रेस संग्रहण फोटो)
-
“मी शाहरुख खान नाही झालो, म्हणजे मी यशस्वी नाही? आपल्या १२० कोटींच्या लोकसंख्येत मोजक्या लोकांना संधी मिळते, त्यात मी आहे हेच मोठं यश नाही का?” हे त्याचे शब्द कृतज्ञतेचा खरा अर्थ सांगतात.. (एक्सप्रेस संग्रह फोटो)
-
गर्दीच्या या जगात, अक्षयचा आवाज वेगळा ठरतो. तो कबूल करतो, संधी मिळणेही भाग्य आहे आणि हे कळणं म्हणजेच खरी नम्रता. (एक्स्प्रेस संग्रहण फोटो)
-
समुपदेशन मानसशास्त्रज्ञ सृष्टी वत्स सांगतात, “यश अभिमानाची गोष्ट आहे, पण ते अहंकारात बदललं तर नाती आणि वैयक्तिक वाढ दोन्ही बाधित होतात.” (एक्सप्रेस संग्रह फोटो)
-
त्या पुढे सांगतात की, “कोणीही एकटा यशस्वी होत नाही. दयाळूपणा, इतरांना मान्यता देणं आणि आत्मजागरूकता ही खरी शक्ती आहे.” (एक्सप्रेस संग्रह फोटो)
-
अखेर, अक्षयचे शब्द आपल्याला आठवण करून देतात—यश म्हणजे फक्त शिखर गाठणं नाही, तर प्रवासातल्या छोट्या विजयांचा आनंद घेणं आहे, समाधान हेच सर्वात मोठं यश आहे. (एक्सप्रेस संग्रहित छायाचित्र)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”