-
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमीच तिच्या निरागस स्मितामुळे प्रेक्षकांना मोहवते. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा साधा पण देखणा लूक चाहत्यांच्या मनात घर करत आहे. पांढऱ्या रंगाच्या पोशाखावर निळ्या फुलांची नक्षी तिच्या सौंदर्याला वेगळाच ठसा उमटवते.
-
तेजश्री प्रधानचा साधेपणाच तिची खरी ओळख असल्याचे अनेक चाहते म्हणतात. कॅमेरासमोर निखळ हसताना काढलेले फोटो पाहून प्रेक्षक पुन्हा एकदा तिच्या मोहिनीला भुलले आहेत. नैसर्गिक लूकमध्ये तेजश्री किती सुंदर दिसू शकते हे पाहण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.
-
कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवताना घेतलेले काही फोटो सध्या चर्चेत आहेत. गप्पागोष्टी आणि जेवणावळीतला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. अशा क्षणचित्रांमधून तिचा साधेपणा आणि घरगुती स्वभाव झळकतो.
-
सोशल मीडियावर आलेल्या या फोटोंमध्ये तेजश्री प्रधान एकदा चंद्राकडे बोट दाखवीत, तर दुसऱ्या क्षणी टेबलावर बसून हसतमुख पोज देताना दिसते. तिच्या सहजसुंदर स्मितामुळे प्रत्येक फोटो वेगळाच भाव निर्माण करतो.
-
सध्या मालिका आणि चित्रपटांमध्ये व्यग्र असतानाही तेजश्री प्रधान आपल्या चाहत्यांशी सतत जोडलेली असते. इृन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या अशा छोट्या छोट्या क्षणांनी तिच्या फॅन्ससोबतचा संवाद अधिक घट्ट होताना दिसतो.
-
तेजश्री प्रधानचा लूक नेहमीच चर्चेत असतो. पांढऱ्या रंगाचा पोशाख, साधे दागिने आणि हातात स्मार्टवॉच अशा साध्या स्टाईलमध्येही ती फॅशनची नवी व्याख्या निर्माण करते. अनेक तरुणींसाठी तिची ड्रेसिंग स्टाईल प्रेरणादायी ठरते.
-
नव्या भूमिका आणि नव्या मालिकेमुळे नेहमीच चर्चेत असलेली तेजश्री प्रधान, ऑफ-स्क्रीन क्षण शेअर करून, चाहत्यांना आपुलकीने जोडते. तिचे हे निखळ आणि हसरे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)

Ratnagiri Accident : रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ अपघात, मुंबईवरुन निघालेली लक्झरी बस जळून खाक