-
स्टार प्रवाहवरील ‘लपंडाव’ या नव्या मालिकेतून कृतिका देव आणि चेतन वडनेरे ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
गणेशोत्सव २०२५ सोहळ्यात दोघे कलाकार खास पारंपरिक लूकमध्ये सजून अवतरले. त्यांच्या या वेगळ्या अंदाजाकडे प्रेक्षकांची नजर खिळली.
-
कृतिका देव हिने नेसलेल्या रेशमी साडीचा डौल आणि नाजूक दागिन्यांची उठावदार जुळवणी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक देखणेपणा देत होती.
-
चेतन वडनेरेने परिधान केलेली आकर्षक शेरवानी आणि त्यावरचा स्टायलिश अंदाज, या लूकमुळे चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले.
-
स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सवाच्या मंचावर या मालिकेची झलक दाखवण्यात आली आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबत नवी उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दाखविणारा त्यांचा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहिला. त्यामुळे फोटोंना खूपच मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
-
१५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘लपंडाव’ या मालिकेतून प्रेक्षकांना एका नव्या नात्याची, नव्या प्रवासाची सुरुवात अनुभवायला मिळणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : चेतन वडनेरे/इन्स्टाग्राम)

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम