-
अभिनेत्री वल्लरी विराजला ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली.
-
नवरी मिळे हिटलरला मालिकेतील तिची लीला ही भूमिका चांगलीच गाजली.
-
आता मालिका संपली असली तरी अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
-
अनेक डान्स व्हिडीओ, फोटो ती शेअर करत असते. विशेष म्हणजे तिने शेअर केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.
-
आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
वल्लरीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पारंपारिक पेहरावात दिसत आहे. तिने साडी नेसली आहे.
-
हे फोटो शेअर करताना तिने गणेश चतुर्थी असे लिहिले आहे.
-
तिच्या या फोटोंवर अनेकांनी सुंदर अशा कमेंट केल्या आहेत. तर आलापिनी निसळने गोड असे लिहित तिचे कौतुक केले आहे.
-
वल्लरी विराज व आलापिनी निसळ अनेक वेगळ्या संकल्पना असलेल्या डान्स व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांचे हे व्हिडीओ प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसते. (फोटो सौजन्य: वल्लरी विराज इन्स्टाग्राम)

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनास पोलिसांची परवानगी, पण मराठा आंदोलकांसमोर ठेवल्या तीन मोठ्या अटी