-
अभिनेता गश्मीर महाजनी हा मराठी चित्रपट, हिंदी वेब सीरिज व मालिका यांमुळे सातत्याने चर्चेत असतो.
-
अभिनयाबरोबरच गश्मीर ‘खतरों के खिलाडी’सारख्या रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी झाला होता. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमातूनही त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. आता अभिनेता काही नवीन प्रोजेक्टवर काम करीत आहे. गश्मीरचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावरदेखील तो चाहत्यांच्या संपर्कात असल्याचे दिसते.
-
गश्मीरला काही दिवसांपूर्वी ‘आस्क मी क्वेश्चन’ या सेशनमध्ये चाहत्यांनी त्याच्या वैयक्तिक, व्यावसायिक आयुष्याबाबत काही प्रश्न विचारले. त्याच्या मुलाबाबतही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच, तो आता कोणत्या चित्रपटातून दिसणार आहे, सोशल मीडियावर तो सातत्याने का दिसत नाही, जेव्हा घाबरल्यासारखे होते, अशा वेळी काय करावे, लक्ष केंद्रित करण्यासाठी काय केले पाहिजे, असे अनेक प्रश्न त्याला विचारले गेले.
-
त्यातील एक प्रश्न होता की, मराठी चित्रपटसृष्टीत तुझी क्रश कोण आहे? त्यावर गश्मीर म्हणाला, “मला वाटते की, आश्विनी भावे मॅडम त्यांच्या काळातील आणि आतासुद्धा क्रश आहेत.”
-
तू सध्या कुठे काम करताना का दिसत नाहीस, या प्रश्नाचे उत्तर देत गश्मीर म्हणाला, “मी सध्या माझ्या चित्रपटावर काम करीत आहे. हा चित्रपट तयार होण्यासाठी खूप वेळ लागत आहे.
-
एका चाहतीने विचारले की, मी अभ्यास करण्याचा खूप प्रयत्न करत आहे. पण, लक्ष केंद्रित करू शकत नाहीये. कृपया काही टिप्स द्या. त्यावर गश्मीरने गमतीशीर उत्तर दिले. अभिनेता म्हणाला की, मला विसरून जा, तुमच्या समस्या आपोआप सुटतील.
-
आणखी एकाने विचारले की, जेव्हा तुला घाबरल्यासारखे वाटते, तेव्हा तू काय करतोस? त्यावर अभिनेता म्हणाला, “मी सोशल मीडियापासून ब्रेक घेतो.”
-
जेव्हा खूप समस्या एकत्र येतात, आयुष्यातला कठीण काळ असतो; त्यावेळी त्याला कसा सामोरा गेलास? तू ती परिस्थिती कशी हाताळलीस? त्यावर गश्मीर म्हणाला, “समस्या आजही आहेत; पण, तुमचे कुटुंब त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा मार्ग सोपा करतात. माझ्या कुटुंबानं ते केलं.”
-
तुझी आवडती सहअभिनेत्री कोण आहे? यावर गश्मीर गमतीने म्हणाला, “माझी पत्नी. ती खूप अभिनय करते.” पुढे त्याने हसण्याच्या इमोजीही शेअर केल्या. दरम्यान, अभिनेता आता आगामी काळात कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (सर्व फोटो सौजन्य: गश्मीर महाजनी इन्स्टाग्राम)

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”