-
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. (फोटो सौजन्य: युट्यूब)
-
२००८ साली सुरू झालेल्या या मालिकेतील सर्वच पात्रे लोकप्रिय झाली आहेत. प्रत्येक पात्राचे काहीतरी वेगळे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे गोकुळधाम सोसायटीमध्ये गमतीजमती घडताना दिसतात. (फोटो सौजन्य: युट्यूब)
-
मालिकेतील जेठालाल व बबिताजी यांची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना आवडते.(फोटो सौजन्य: युट्यूब)
-
बबिताला खूश करण्यासाठी जेठालाल अनेक गोष्टी करताना दिसतो. (फोटो सौजन्य: युट्यूब)
-
जेठालाल ही भूमिका अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारली असून मुनमुन दत्ताने बबिता ही भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य:मुनमुन दत्ता इन्स्टाग्राम)
-
गेल्या १७ वर्षांपासून म्हणजे मालिकेच्या अगदी सुरुवातीपासून या दोन्ही कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. (फोटो सौजन्य:मुनमुन दत्ता इन्स्टाग्राम)
-
पण, तुम्हाला माहितेय का? ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेआधीही दिलीप जोशी व मुनमुन दत्ताने स्क्रीन शेअर केली आहे. (फोटो सौजन्य:मुनमुन दत्ता इन्स्टाग्राम)
-
२००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम सब बाराती’ या मालिकेत त्यांनी एकत्र काम केले होते. (फोटो सौजन्य: दिलीप जोशी इन्स्टाग्राम)
-
दिलीप जोशींनी नाथू मेहता, तर मुनमुन दत्ताने मीठी ही भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य: दिलीप जोशी इन्स्टाग्राम)

सरकारचा मोठा निर्णय! हैदराबाद गॅझेट लागू करण्यास तत्वत: मंजुरी, माजी न्या. शिंदेंचा मनोज जरांगेंना शब्द