-
तमिळ सुपरस्टार विशाल गेल्या काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. (Photo: Vishal/Instagram)
-
बऱ्याच दिवसांपासून अभिनेता त्याच्या वाढदिवशी म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी अभिनेत्री सई धनशिकाशी लग्न करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. (Photo: Vishal/Instagram)
-
आता याबद्दल अभिनेत्याने स्वतःच त्याच्या सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शे्अर केले आहेत आणि सांगितले आहे की त्याने लग्न नव्हे तर साखरपुडा केला आहे. (Photo: Vishal/Instagram)
-
तसेच यावेळी त्याने लग्न पुढे ढकलण्याचे कारणही सांगितले आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने घोषणा केली होती की नदीगर संगम या इमारतीचे बांधकाम अपूर्ण असल्याने लग्न पुढे ढकलत आहे. (Photo: Vishal/Instagram)
-
नवीन नदीगर संगम इमारतीचे (साऊथ कलाकारांच्या संघटनेची इमारत) उद्घाटन झाल्यानंतरच त्यांना लग्न करायचे आहे. आता, विशालच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त, या जोडप्याने साखरपुडा केला आहे. (Photo: Vishal/Instagram)
-
अभिनेत्याने त्याच्या हँडलवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आणि लिहिले, “माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देणाऱ्या जगातल्या सर्व चाहते व सर्व प्रियजनांचे मनापासून आभार.” (Photo: Vishal/Instagram)
-
त्याने पुढे लिहिले, “आज मी तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी सांगत आहे की माझ्या कुटुंबियांच्या उपस्थितीत मी साई धनशिकाशी साखरपूडा केला आहे. (Photo: Vishal/Instagram)
-
मला खूप सकारात्मक आणि छान वाटत आहे. नेहमीप्रमाणे, मला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी राहूद्या.” (Photo: Vishal/Instagram)
-
दरम्यान, विशाल आणि साई १५ वर्षांपासून मित्र आहेत व अभिनेत्री अभिनेत्यापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. हेही पाहा- Ganeshotsav 2025: अमृता धोंगडेचा गणेशोत्सवात सुंदर लूक, घरातल्या बाप्पाबरोबर काढले फोटो

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”