-
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री काजोल देवगण पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली ही साडी झरी बॉर्डर आणि ब्रॉकेड फॅब्रिकमुळे उठावदार भासत आहे.
-
सोन्याच्या छटेतील ही साडी अभिनेत्रीच्या राजेशाही व्यक्तिमत्त्वाला पूर्ण न्याय देते.
-
दागिन्यांच्या माळेसारखा कॉलर अभिनेत्रीच्या गळ्याला अधिक शोभा आणतो.
-
अनकट ज्वेल्सने सजवलेला ब्लाऊज कॉलर हा या लूकचा सर्वांत आकर्षक भाग ठरला आहे.
-
साध्या हेअरस्टाईलमध्ये काजोलचा चेहरा अधिक उठून दिसत असून, तिच्या सौंदर्याला वेगळेच तेज प्राप्त झाले आहे.
-
परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम या पोशाखात दिसून येत असल्याने काजोलचा लूक अविस्मरणीय वाटतो.
-
डिझायनर मनीष मल्होत्राच्या खास कलेक्शनमधील ही साडी ‘टाइमलेस कुट्युर’ची जाणीव करून देते.
-
(सर्व फोटो सौजन्य : manishmalhotraworld
/इन्स्टाग्राम)

‘हे’ झाड तारक की मारक ? इतर राज्यात बंदी, महाराष्ट्रात मात्र धडाक्यात…