-
‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेतील मुख्य कलाकार समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर नुकतेच कोल्हापूरला महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला गेले होते.
-
पारंपरिक वेशभूषेत दोघांनी घेतलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
समृद्धीने जांभळ्या रंगाची साडी नेसून, देखणा लूक साकारला आहे; तर अक्षयने पिवळ्या कुर्त्यात पारंपरिक स्टाईल दाखवली आहे.
-
देवीच्या गाभाऱ्यातील वातावरणात टिपलेले फोटो पाहून चाहत्यांनी ‘खऱ्या अर्थाने मराठमोळेपण’ जाणवल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
-
कोल्हापूरकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल समृद्धीने खास पोस्ट करीत आभार मानले आहेत.
-
“कायमच भरभरून प्रेम करीत आला आहात… हीच खरी संपत्ती आहे,” असे समृद्धीने चाहत्यांना उद्देशून म्हटले आहे.
-
मालिकेत ऑनस्क्रीन भूमिका साकारताना चाहत्यांना आवडलेल्या या जोडीला ऑफस्क्रीनही मोठी लोकप्रियता मिळते आहे.
-
समृद्धी आणि अभिषेक या दोघांना स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे घराघरात ओळख मिळाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर/इन्स्टाग्राम)

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…