-
लाखात एक आमचा दादा या मालिकेत मृण्मयी गोंधळेकर हिने तुळजा ही भूमिका साकारली आणि ती प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली.
-
मृण्मयीच्या शांत, सौम्य अभिनयामुळे तुळजा हे पात्र प्रेक्षकांना भावले.
-
कॅमेऱ्यासमोर बिनधास्त आणि प्रांजळ अभिनय करून, तिने या व्यक्तिरेखेला वेगळी ओळख दिली.
-
वज्र प्रॉडक्शनच्या या प्रवासात मृण्मयी व तुळजा यांचा संगम घडला आणि मालिकेला नवे यश लाभले.
-
लाखात एक आमचा दादा ही मालिका संपणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
-
त्यातच मृण्मयीने लिहिलेली ही पोस्ट चर्चेत आली आहे.
-
मृण्मयीने आपल्या अभिनयातून तुळजाला जिवंत केले आणि प्रेक्षकांनीही तिला भरभरून प्रेम दिलं.
-
मृण्मयीने भावूक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिने लिहिले की “मृण्मयी आणि तुळजाची पडली गाठ, दोघींमध्ये झाली मैत्री दाट. मृण्मयी जशी शांत, सौम्य, सोज्ज्वळ, तुळजा तशी बोल्ड, बिनधास्त; पण तेवढीच प्रांजळ. ‘वज्र प्रॉडक्शन’मध्ये तुळजा मृण्मयीचा झाला उगम, तेव्हाच एका नायिकेचा, तिच्या पात्राशी झाला संगम. मृण्मयी तुळजाने धरून हातात हात, केला लाखात एक मालिकेचा यशस्वी प्रवास. मृण्मयीने व्यक्तिरेखेतून तुळजाला दाखवलं, तुळजानं हाडाची कलाकार म्हणून मृण्मयीला घडवलं. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला तुळजानं शिकवलं. मृण्मयीनं तुळजाकडून असं बरंच काही मिळवलं. मृण्मयीला गवसली तुळजासारखी लाखात एक गुरू, तिच्याच साथीने चालू राहील मृण्मयीचा यशस्वी प्रवास सुरू. वज्र प्रॉडक्शनचा मिळाला लाखमोलाचा हातभार; त्यासाठी मृण्मयी व तुळजाकडून त्यांचे लाख लाख आभार! “Heartist heartist thank you”
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी गोंधळेकर/इन्स्टाग्राम)

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…