-
अभिनेत्री ऐश्वर्या शेटे हिने आपल्या खास पारंपरिक अंदाजातील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तिने यावेळी पिवळ्या रंगाची उठावदार पैठणी साडी परिधान केली आहे.
-
या साडीला गडद निळ्या रंगाचा झगमगता ब्लाऊज अप्रतिम शोभून दिसतो आहे.
-
गळ्यातील मंगळसूत्र, नथ व हिरवा चुडा या पारंपरिक दागिन्यांनी तिच्या लूकला विशेष आकर्षण दिले आहे.
-
ऐश्वर्याने कपाळावर लावलेली छोटीशी काळी टिकली तिचे सौंदर्य आणखी खुलवते.
-
सुंदर झाडांच्या हिरवाईत टिपलेले हे फोटो तिच्या लूकला नैसर्गिक आणि देखणे रूप देतात.
-
‘संस्कृती जपणं ही आपली जबाबदारी आहे; AI ची नाही’, अशी कॅप्शन ऐश्वर्याने या फोटोंना दिली आहे
-
या कॅप्शनमधून अभिनेत्रीने आधुनिकतेसोबतच संस्कृती जपण्याचा खास संदेश दिला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या शेटे/इन्स्टाग्राम)

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…