-
‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत अखेर अर्णव आणि ईश्वरीचं लग्न पार पडलं आहे.
-
लग्नाचा सोहळा सर्व रीतीरिवाजांसह पार पडल्याचं या फोटोंमधून दिसून येत आहे.
-
अभिजीत आमकरने (अर्णव) या मालिकेतील लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
-
अर्णवने चमकदार गुलाबी रंगाचा कुर्ता आणि जाकीट परिधान केले आहे.
-
तर ईश्वरीने सुंदर पैठणी नेसून खास लूक पूर्ण केला. दोघांचे हे मिळते-जुळते कपडे चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
-
ईश्वरीच्या नाकातील नथ, गळ्यातील मंगळसूत्र आणि केसांत सजवलेल्या फुलांनी तिच्या सौंदर्याला उठाव मिळाला. मराठमोळ्या नववधूचा हा अंदाज चाहत्यांच्या मनाला भावला.
-
दोघांनी पारंपरिक पद्धतीने फुलांचे हार घातल्याचे दिसले. लाल-पांढऱ्या फुलांच्या माळांनी त्यांच्या लूकला अधिक आकर्षण मिळाले.
-
मालिकेतील या लग्नानंतर कथानकाला नवे वळण मिळाले असून, पुढचे भाग अधिक रंजक ठरणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिजीत आमकर/ इंस्टाग्राम)

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…