-
अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोलेने विजयादशमीच्या निमित्ताने पारंपरिक लूकमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
हिरव्या रंगाच्या आकर्षक साडीत तिने साधेपणातही देखणेपणा टिपला आहे. साडीवरील सोनसळी पट्टे आणि चौकटी तिच्या लूकला उठावदार बनवतात.
-
गिरिजाने या साडीवर गडद लाल रंगाचा ब्लाऊज घातला आहे. या कॉम्बिनेशनमुळे हिरव्या रंगाचा पारंपरिक पोशाख आणखी खुलून दिसतो.
-
गळ्यात तिने चांदीची तीन पदरी माळ घातली आहे. या दागिन्यांनी तिचा लूक अधिक राजेशाही भासतो आहे.
-
कानांत तिने एकापेक्षा जास्त कर्णफुले घातली असून, वेगवेगळ्या डिझाइन्समुळे चेहऱ्याला एक वेगळाच आकर्षक लूक मिळतो.
-
हिरवी साडी, लाल ब्लाऊज व चांदीचे दागिने हे संयोजन गिरिजाच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी साजेसे वाटते. पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा समतोल साधणारा हा लूक आहे.
-
विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! या कॅप्शनसह शेअर केलेल्या तिच्या या फोटोमध्ये परंपरेचा साज, स्त्रीसौंदर्याचा गोडवा आणि उत्सवी आनंदाची झळाळी एकत्रितपणे अनुभवायला मिळते.
-
(सर्व फोटो सौजन्य: गिरिजा ओक गोडबोले/इन्स्टाग्राम)

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS