-
उद्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे.
-
त्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘लालबागचा राजा” च्या दर्शनासाठी पोहोचले.
-
यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.
-
मुख्यमंत्र्यांच्या दर्शनावेळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, श्रीकांत शिंदे त्यांच्या पत्नी, मुलासह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते.
-
उद्या होणाऱ्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
-
मुख्यमंत्री लालबागचा राजाच्या दरबारात पोहोचले असता त्यांनी मनोभावे बाप्पांचं दर्शन घेतलं आणि बाप्पाच्या चरणी माथा टेकत आशीर्वाद घेतला.
-
बाप्पाकडे काय मागितले?
“राज्यातील जनतेला सुखी, समाधानी, आनंदी ठेव तसेच राज्यातील बळीराजाच्या सर्व अडचणी दूर कर, यंदा पाऊस चांगला पडला आहे, त्यामुळे बळीराजाचे पीक चांगले येऊ देत एवढेच मागणे श्रींच्या चरणी मागितले.” अशी पोस्ट या दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावरून शेअर करण्यात आली आहे. (Photos- Express Photos by Deepak Joshi)
Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा