-
अभिनेत्री सायली संजीवने ‘पद्माक्षी आणि अत्तूचा बाप्पा’ या कॅप्शनसह गणेशोत्सवाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली.
-
गुलाबी रंगाच्या झगमगत्या साडीत सायलीचा पारंपरिक लूक बाप्पांच्या आगमनाला शोभून दिसतो.
-
फुलांच्या वलयामध्ये सजवलेल्या गणपतीबाप्पाचा देखणा थाट लक्ष वेधून घेतो.
-
घरगुती सजावट, नैवेद्य आणि फळांची आरास यांमुळे भक्तिभावाचे वातावरण जाणवते.
-
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा उदगारांतून अभिनेत्रीने बाप्पावरील श्रद्धा व्यक्त केली.
-
हसऱ्या चेहऱ्याने बाप्पासमोर बसलेली सायली आणि तिची भाची गणेशोत्सवाचा आनंद अनुभवताना दिसते.
-
सोन्याच्या काठाच्या साडीसोबत हिरव्या चुड्याचा संगम तिच्या पारंपरिक रूपाला खुलवतो.
-
फुलांचा सुवास, सजावटीची झळाळी आणि घरगुती उत्सवाचा साधा, पण मोहक थाट दिसतो.
-
(सर्व फोटो सौजन्य: सायली संजीव/ इंस्टाग्राम)

आज गणेश चतुर्थीला ‘या’ ३ राशींवर गणपती बाप्पाची विशेष कृपा! अचानक धनलाभ तर आयुष्यातील अडचणी अखेर होतील दूर