-
अनन्या पांडेच्या घरी यंदा गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या उत्साहात झाले असून, तिच्या कुटुंबासोबत केल्या गेलेल्या पूजेचे फोटो सध्या चर्चेत आहेत.
-
घरातल्या सजावटीकडे पाहताच डोळे दिपून जातात गुलाबी, पांढऱ्या, जांभळ्या व पिवळ्या रंगांच्या फुलांनी तयार केलेली भव्य बॅकग्राऊंड सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
पारंपरिक पांढऱ्या रंगाच्या आकर्षक कुर्त्यात अनन्या पांडेने बाप्पाची पूजा केली असून, तिचा हा साधा; पण देखणा लूक चाहत्यांना भावतो आहे.
-
खास बाब म्हणजे कुटुंबातील पाळीव कुत्रादेखील पूजेच्या वेळी हजर होता आणि त्याच्या उपस्थितीने या क्षणाला आणखी खास बनवले.
-
गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर फळे, नारळ, दिवे, नैवेद्य आणि हार-फुलांचा मनमोहक शृंगार केला गेला असून श्रद्धा व सौंदर्याचा सुंदर मिलाफ दिसून येतो.
-
भव्य फुलांची सजावट, दिव्यांचा उजेड व भक्तिभावाने सजलेला हा गणेशोत्सव घरात सकारात्मकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण करीत आहे.
-
अनन्या पांडेचे गणपतीच्या पूजेतील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यातील सजावट आणि तिच्या पारंपरिक लूकचे कौतुक होत आहे.
-
गणपतीच्या या आनंदोत्सवात अनन्या पांडेचे आई-वडीलदेखील तिच्यासोबत सामील झाले होते. सर्वांनी एकत्रितपणे बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.
-
(सर्व फोटो सौजन्य: अनन्या पांडे/ इंस्टाग्राम)

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनास पोलिसांची परवानगी, पण मराठा आंदोलकांसमोर ठेवल्या तीन मोठ्या अटी