-
भाग्यश्री लिमये हिने यंदा आपल्या घरी पर्यावरणपूरक मातीच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून गणेशोत्सव अधिक खास बनवला आहे.
-
घरातील सजावटीत फुलांचा सुगंध, पारंपरिक थाट व आकर्षक रंगसंगती यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.
-
नैसर्गिक फुलांनी केलेली सजावट आणि फळांच्या नैवेद्यानं भक्तिभावाला एक वेगळं रूप दिलं आहे.
-
अभिनेत्रीनं साडीचा पारंपरिक लूक निवडत साधेपणातही सौंदर्य खुलवलं आहे.
-
गणरायाचा आवडता असलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवत असताना तिच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक झळकत होती.
-
घरच्या छोटेखानी; पण सुंदर गणेशोत्सवात भक्ती, सौंदर्य व शांतता यांचं अप्रतिम दर्शन घडत आहे.
-
तिच्या मांजरीसोबतचे क्षण उत्सवात प्रेम आणि आपुलकीची गोड छटा निर्माण करतात.
-
मातीची मूर्ती आणि नैसर्गिक सजावट यांद्वारे पर्यावरणपूरकतेचा संदेश अधोरेखित केला गेला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: भाग्यश्री लिमये/ इंस्टाग्राम)

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनास पोलिसांची परवानगी, पण मराठा आंदोलकांसमोर ठेवल्या तीन मोठ्या अटी