-
सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. मुंबईतले गणपती हा प्रत्येकासाठी आकर्षाणाचा विषय असतो. मुंबईमध्ये अनेक असे मंडळं आहेत ज्यांच्या गणेशमुर्ती अतिशय भव्य असतात. या मंडळांचे देखावे पाहण्यासाठी व गणरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या तिथे संख्येनं हजेरी लावत असतात. आज आपण अशाच काही अशाच काही मंडळांबद्दल जाणून घेऊयात ज्यांना तुम्ही नक्की भेट देऊ शकता.
-
लालबागचा राजा (परळ)
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालगाबचा राजा, यंदाचं ९२ वं वर्ष.
लोअर परळ / करी रोड स्टेशनवरुन तिथे पोहोचता येतं. -
मुंबईचा राजा, गणेश गल्ली (लालबाग)
लालबागच्या राजाच्या जवळचं असलेला गणेश गल्लीचा मुंबईतला राजा दरवर्षी विविध भव्य थीम वर आधारीत देखावे करण्यासाठी प्रसिद्ध आहे.लालबागच्या राजापासून चालत जाता येते. -
जीएसबी सेवा मंडळ (माटुंगा)
मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जाणारा गणपती म्हणजे जीएसबी गणपती. १९५४ मध्ये पहिल्यांदा या गणपतीची स्थापना झाली.
पोहोचण्याचा मार्ग – माटुंगा / किंग्ज सर्कल स्टेशन. -
खेतवाडीचा राजा (गिरगाव)
मुंबईतील सर्वात उंच गणपतीची मूर्ती ही खेतवाडीच्या राजाची असते. (३५-४० फूट) या मंडळपरिसरात खूप गर्दी असते.
पोहोचण्याचा मार्ग- ग्रँट रोड स्टेशन. -
चिंचपोकळीचा चिंतामणी (चिंचपोकळी)
१९२० मध्ये या बाप्पाची सुरूवात झाली. हे मंडळही सर्वात जुन्या मंडळांपैकी एक आहे. लाखो भाविकांसाठी आकर्षणाचा विषय.
पोहोचण्याचा मार्ग- चिंचपोकळी स्टेशन. -
गिरवगाचा राजा (गिरगाव)
मुंबईचा पारंपरिक व सांस्कृतिक वारसा जपणारे मंडळ तसेच पर्यावरणपूरक मूर्तीसाठी प्रसिद्ध.
पोहोचण्याचा मार्ग- चर्नी रोड स्टेशन. -
अंधेरीचा राजा (अंधेरी पश्चिम)
इच्छा पूर्ण करणारा नवसाचा राजा म्हणूनही अंधेरीचा राजा प्रसिद्ध आहे. पाहोचण्याचा मार्ग- अंधेरी स्टेशन, आझाद नगर. -
केशवजी नाईक चाळ (गिरगाव)
मुंबईतील पहिला सार्वजनिक गणपती, स्वातंत्र्यलढ्यादरम्यान लोकांना एकत्र करण्यासाठी १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केला.पाहोचण्याचा मार्ग- चर्नी रोड स्टेशन -
सह्याद्री क्रीडा_मंडळ (टिळक नगर, चेंबूर)
प्रचंड उत्साह, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध, दरवर्षी स्थानिकांची मोठी गर्दी असते.
पाहोचण्याचा मार्ग- चेंबूर स्टेशन, टिळक नगर. -
कॉटन ग्रीन चा राजा (काला चौकी)
अद्वितीय सर्जनशील सजावटींसाठी लोकप्रिय पाहोचण्याचा मार्ग- भायखळा / कॉटन ग्रीन स्टेशन. -
तेजुकायाचा राजा (परळ)
सर्वात उंच पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचा जागतिक विक्रम या मंडळाच्या नावावर आहे, इथेही दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येतात.
पाहोचण्याचा मार्ग- लोअर परळ स्टेशन. (सर्व फोटो साभार- सावे टूर्स इन्स्टाग्राम पेज) हेही पाहा- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचं शिक्षण किती?

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा