फळे खाणे आरोग्यासाठी चांगले असते असे आपण नेहमी ऐकतो. ऋतूनुसार त्या ऋतूतील फळे आवर्जून खायला हवीत. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. (सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) लहान मुले किंवा अगदी मोठी माणसेही फळे खाण्याचा कंटाळा करताना दिसतात. सफरचंद हे फळ आरोग्याला अतिशय उपयुक्त असे फळ आहे असे म्हटले जाते. ज्येष्ठांना आणि गर्भवती महिलांना आवर्जून सफरचंद खाण्यास सांगितले जाते. पण अनेकांना सफरचंद साले काढून खायची सवय असते. मात्र, सफरचंदाची साले आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. पाहूयात सफरचंदाच्या सालांचे उपयोग. सफरचंदाची साले रक्तातील सारखेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे ज्यांना मधुमेह असेल त्यांनी सफरचंद सालासकट खाणे गरजेचे आहे. सफरचंदाच्या सालांमुळे मेंदूतील पेशी लवकर खराब होत नाहीत. तसेच यामुळे बुद्धी तल्लख होण्यास मदत होते. त्यामुळे सालीसकट खाल्लेले सफरचंद फायद्याचे असते. नियमितपणे सफरचंद खाल्ल्यास मोतीबिंदू होत नाही. सफरचंदात जास्त प्रमाणात फायबर असल्याने पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी ते अतिशय उपयुक्त असते. शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठीही मदत होते. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांच्यासाठीही सफरचंद खाणे फायदेशीर असते. सफरचंद हे दातांना किडण्यापासून बचाव करते. याशिवाय गर्भवती महिलांमध्ये रक्तवाढीसाठी सफरचंद उपयुक्त ठरते. त्यामुळे सफरचंदाचा आहारातील समावेश तोही सालांसकट अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे कधीही सफरचंद खाताना ते सालासकट खावे

MNS Leader Son : मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर धिंगाणा, मराठी इन्फ्लुएन्सरला शिव्या देत म्हणाला; “माझा बाप..”