आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणं केंद्र सरकारनं अनिवार्य केलं आहे. त्यासाठी ३० जून २०२० ही डेडलाइन आहे. तुम्हीही अद्याप आधार-पॅन लिंक केलेलं नसेल तर तुम्हाला या सोप्या टिप्स कामी येतील. -
१. आयकर विभागाच्या वेबसाईटवर (https://www.incometaxindiaefiling.gov.in/home) गेल्यास अशी स्क्रिन येईल.
-
२. या वेबसाइटवर डाव्या बाजूला ‘link adhaar’ हा पर्याय आहे. त्यावर क्लिक केल्यावर एक फॉर्म येईल.
-
३. या फॉर्ममध्ये तुम्हाला वेगवेगळी माहिती भरावी लागेल. त्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुमच्या समोर असू द्या.
-
४. जिथे पॅन असं लिहिलेलं आहे, तिथे पॅन नंबर टाका. हा नंबर तुमच्या पॅन कार्डवर असेल.
-
५. त्यानंतर तुम्हाला आधार कार्डची माहिती द्यायची आहे. या बॉक्समध्ये आधार कार्डवर दिलेला नंबर टाकावा लागेल.
-
६. Name as per AADHAAR या बॉक्समध्ये तुमच्या आधार कार्डवर दिलेलं इंग्रजीतील नाव जशास तसं टाकावं लागेल. त्यात कोणतीही चूक झाल्यास लिंक होणार नाही.
-
७. ही माहिती भरताना तुम्हाला ‘ i have only year of birth in adhaar card’ चा पर्याय दिसेल. जर तुम्ही आधारकार्डवर फक्त जन्मवर्षच भरलं असेल तर या पर्यायावर टिक करा.
-
८. त्यानंतर या बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला आधार कार्डची वैधता तपासण्याची परवानगी द्यावी लागेल.
-
९. वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला आता कॅप्चा कोड असा बॉक्स दिसेल. त्यात इंग्रजीत दिलेला कोड खालील बॉक्समध्ये भरावा लागेल. त्यातही कोणतीही चूक करू नका. अन्यथा पॅन-आधार लिकिंगची प्रक्रिया पुढे जाणारच नाही.
-
१०. आता शेवटी तुमचं आधार लिंक करण्यासाठी Link AADHAAR या बॉक्सवर क्लिक करा. तुमचं पॅन-आधार लिकिंग होईल.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल