-
ऑटो एक्स्पो 2020 मध्ये हेक्टर प्लसची झलक दाखवल्यानंतर अखेर एमजी मोटर इंडियाने आपली बहुप्रतिक्षित 6-सीटर एसयूव्ही भारतात लाँच केली आहे. (सर्व फोटो – MG Motor)
-
हेक्टर प्लस भारतातील पहिली 6आसनी इंटरनेट एसयूव्ही असून ती पॅनोरमिक सनरूफसह येते, असा कंपनीचा दावा आहे.
-
ही नवीन एसयूव्ही म्हणजे आधीपासून बाजारात असलेल्या 5-सीटर Hector एसयूव्हीची पुढील 6-सीटर आवृत्ती आहे.
-
हेक्टर प्लसमध्येही एमजी मोटरची i-स्मार्ट कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आहे. यात 55 पेक्षा जास्त फीचर्स आहेत.
-
हेक्टर प्लसमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे या गाडीचं लूक हेक्टरपेक्षा थोडं वेगळं ठरतं.
-
नव्या कारला थिक एलईडी डीआरएल, ऑल-ब्लॅक ग्रिल, रेस्टलेड फ्रंट बंपर, हेडलाइट आणि फॉग-लँप क्लस्टर, रिअर बंपर्स, नवी रिअर टेल लाइट डिझाइन आणि रिव्हाइज्ड स्कीड प्लेट्सद्वारे पूर्ण नवीन डिझाइन देण्याचा कंपनीने प्रयत्न केला आहे.
-
एमजी हेक्टर प्लसमध्ये हेक्टरपेक्षा वेगळे क्रोम फ्रंट ग्रिल, नवीन एलईडी DRL (डे-टाइम रनिंग लाइट्स), नवीन एलईडी हेडलॅम्प, नवीन डिझाइनसह रिअर टेललॅम्प दिला आहे.
-
तसेच, फ्लोटिंग सिग्नल टर्न इंडिकेटर्स, शार्क फिन अँटीना, नवीन फ्रंट आणि रिअर बंपर, बोल्ड स्किड प्लेट्स आणि ड्युअल टोन मशीन्ड अॅलॉय व्हिल्स नवीन हेक्टर प्लसमध्ये आहेत.
-
तीन रांगेत एकूण 6-सीट्स आहेत. हेक्टर प्लस 1.5-लिटर पेट्रोल, 1.5-लिटर पेट्रोल हाइब्रिड आणि 2-लिटर डिझेल इंजिन अशा तीन इंजिन प्रकारात येते.
-
दोन्ही पेट्रोल इंजिन 143 PS ची पॉवर आणि 250Nm टॉर्क निर्माण करतात. तर, डिझेल इंजिन 170 PS ची पॉवर आणि 350Nm टॉर्क निर्माण करतं.
-
तिन्ही इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड आहे.
-
याशिवाय हाइब्रिड पेट्रोल इंजिन मॉडेलमध्ये ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचाही पर्याय आहे.
-
फीचर्स :- हेक्टर प्लसमध्ये पॉवर अॅड्जस्टेबल ड्रायव्हर सीट, पॉवर्ड टेलगेट ओपनिंग, स्मार्ट स्वाइप ऑटो टेलगेट ओपनिंग, हीटेड आउट साइड रिअर व्ह्यू मिरर्स, ड्युअल-पॅन पॅनोरमिक सनरूफ, रेन सेन्सिंग वाइपर्स, ऑटो हेडलॅम्प्स, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसोबत 10.4-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि इन्फिनिटी प्रीमियम साउंड सिस्टिम यांसारखे अनेक शानदार फीचर्स आहेत.
-
सिक्युरिटी फीचर्स :- याशिवाय नवीन हेक्टर प्लस एसयूव्हीमध्ये 6-एअरबॅग, एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट, ईएसपी, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम, 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, फ्रंट व रिअर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आणि हिल-होल्ड कंट्रोल यांसारखे फीचर्स सुरेक्षाच्या दृष्टीकोनातून देण्यात आले आहेत.
किंमत : भारतीय मार्केटमध्ये Hector Plus ही एसयूव्ही, टोयोटा इनोव्हा क्रिस्टाला टक्कर देईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. टोयोटा इनोव्हामध्ये सात व्यक्ती प्रवास करु शकतात, तर हेक्टर प्लसमध्ये त्यापेक्षा एक व्यक्ती कमी म्हणजे सहा व्यक्ती प्रवास करु शकतात. पण, हेक्टर प्लसची किंमत इनोव्हाच्या बेसिक मॉडेलपेक्षा जवळपास 2.17 लाख रुपयांनी कमी असल्यामुळे, आसनक्षमता एकने कमी असली तरी ही एसयूव्ही इनोव्हाला आव्हान निर्माण करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. Hector Plus ही एसयूव्ही, टोयोटा इनोव्हासोबतच Tata Gravitas आणि Mahindra XUV500 यांसारख्या गाड्यांना टक्कर देईल. जाणून घेऊया किती Hector Plus ची किंमत ? :- 13.49 लाख रुपये इतकी Hector Plus एसयूव्हीची बेसिक एक्स-शोरुम किंमत आहे. हेक्टर प्लसच्या पेट्रोल इंजिन मॉडेलची एक्स-शोरुम किंमत 13.49 लाख ते 18.21 लाख रुपयांदरम्यान आहे. तर, डिझेल मॉडेलची किंमत 14.44 लाख ते 18.54 लाख रुपयांदरम्यान आहे. 13 ऑगस्टनंतर किंमतीत 50 हजार रुपयांची वाढ केली जाईल असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Donald Trump : “जर युक्रेनबरोबरचं युद्ध थांबवलं नाही तर…”, डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला धमकी? ५० दिवसांचा दिला अल्टिमेटम