-
गणेशोत्सवात मखरासोबत बाप्पांचा साजही तितकाच महत्त्वाचा आहे. बाजारात आपल्याला बाप्पांसाठी अनेक दागिने दिसून येतात.
-
गणेशोत्सवानिमित्त सराफ बाजारात साधारण चार महिने अगोदर बाप्पासाठी आकर्षक आणि विविध प्रकारचे दागिने खरेदी करण्यासाठी गर्दी वाढू लागते.
-
बाप्पांच्या दागिन्यांमध्ये दरवर्षी नवलाई पाहायला मिळते. सोन्याच्या पाण्याचा वापर करून घडविलेले दागिने, चांदीचे दागिने यांसोबतच आता भक्तांना अधिक ऑप्शन्सही उपलब्ध झाले आहेत.
-
काळ बदलला तसे बाप्पांच्या दागिन्यांमध्येही बराच फरक पडलेला दिसून येतो.
-
खणाची साडी, दुपट्टे आणि अगदी कुर्तेसुद्धा आपण पाहिलेत. पण आता याच खणाचे विविध अलंकार ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत.
-
'रंगीश' या ब्रँडने गणेशोत्सवासाठी खणाचे अलंकार डिझाइन केले आहेत.
-
लालबागमध्ये राहणारी कादंबरी साळवी हिच्या कल्पनेतून 'रंगीश' हा ब्रँड साकारला गेला आहे.
-
दागिन्यांसाठी असलेली आवड आणि वेगळं काहीतरी करण्याची जिद्द यांतून तिने खणाच्या दागिन्यांचा ट्रेण्ड काढला.
-
'रंगीश'चे हे दागिने अनोख्या डिझाइनमध्ये उपलब्ध असून तुमच्या आवडीनुसारही ते डिझाइन केले जातात.
-
महाराष्ट्राच्या संस्कृतीत खणाच्या कापडाचं एक वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळे खणाच्या कापडाने बनविलेले हे दागिनेसुद्धा अत्यंत आकर्षक व तितकेच पारंपरिक वाटतात.
-
कंठी, बाजूबंद, मनगटी सेट असे विविध खणाचे आभूषण उपलब्ध आहेत.
-
'रंगीश' या इन्स्टाग्राम पेजवरून हे दागिने तुम्हाला ऑनलाइनसुद्धा ऑर्डर करता येतील.
-
हार, कडे, कंठ्या, तोडे, दुर्वा, बाजूबंद अशा पारंपरिक दागिन्यांच्या ऑर्डर्स दिल्या जातात.
-
यंदा मात्र सार्वजनिक गणेशमूर्तीच्या उंचीवर चार फुटांची मर्यादा आली आहे. त्यामुळे मंडळांनी देखील दागिने घडवण्याच्या प्रक्रियेकडे यंदा पाठ फिरवली असून नेहमीच्या दागिन्यांनी बाप्पाला मढवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
येत्या २२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे.

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”