-
फ्रान्सची प्रमुख वाहन निर्माता कंपनी Renault ने आज (दि.17 ऑगस्ट ) भारतीय बाजारात आपली लोकप्रिय एसयूव्ही Duster नवीन टर्बो पेट्रोल इंजिनसह लाँच केली. आकर्षक लूक आणि दमदार इंजिनसह आलेली नवीन डस्टर आता आपल्या सेगमेंटमधील सर्वात पॉवरफुल एसयूव्ही बनल्याचा दावा कंपनीने केला आहे.
-
जुन्या डस्टरच्या तुलनेत नवीन डस्टर टर्बो SUV मध्ये कंपनीने काही बदल केले आहेत. आधीपेक्षा अजून जास्त 'बोल्ड लूक' या एसयूव्हीला देण्यात आलं आहे.
-
नवीन डस्टरच्या फ्रंट ग्रिल आणि टेल गेटसह रूफ रेल आणि फॉग लॅम्पमध्येही बदल झाला आहे. याशिवाय कंपनीने नवीन डस्टरमध्ये फुल क्रोम ग्रिल, ड्युअल टोन बॉडी कलर बंपर, मस्क्यूलर स्कीड प्लेट, सिग्नेचर प्रोजेक्टर हेडलॅम्पसोबत एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्सचाही समावेश केला आहे.
-
नवीन डस्टरमधील फोर्जा डायमंड कट अॅलॉय व्हीलमुळे गाडीची साइड प्रोफाइल अजून शानदार झाली आहे. पण एसयूव्हीच्या ग्राउंड क्लिअरन्समध्ये बदल झालेला नाही, त्यामुळे आधीप्रमाणेच 205 mm इतका ग्राउंड क्लिअरन्स मिळेल.
-
कंपनीने डस्टर टर्बो पेट्रोल एकूण 5 व्हेरिअंट्समध्ये आणली आहे. यात 3 मॅन्युअल गिअरबॉक्स (RXE, RXS, RXZ) पर्याय आहेत, तर दोन X-Tronic CVT पर्याय आहेत.
-
डस्टर टर्बोच्या मॅन्युअल व्हेरिअंटमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स आहेत. तर, CVT व्हेरिअंटमध्ये X-Tronic युनिट आहे.
-
नवीन डस्टरमध्ये 1330cc, 1.3 लिटर, 4- सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 154bhp ची पॉवर आणि 250NM टॉर्क निर्माण करतं.
-
नवीन डस्टर टर्बो ह्यूंडाई क्रेटा आणि किया सेल्टॉसपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. कारण, या दोन्ही एसयूव्ही डस्टर टर्बोच्या तुलनेत फक्त 140bhp पॉवर जनरेट करतात आणि 1.0L T-GDi इंजिनसह येतात.
-
ह्युंडाई क्रेटा आणि किआ Seltos या दोन एसयूव्हीच्या टर्बो पेट्रोल मॉडेलच्या तुलनेत नवीन टर्बो पेट्रोल मॉडेलमधील डस्टर जवळपास 5 लाख रुपयांनी स्वस्त देखील आहे.
-
कंपनीने Renault Duster टर्बो पेट्रोलमध्ये गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन (GDI)तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. याद्वारे ही एसयूव्ही चांगला माइलेज देईल असं कंपनीने म्हटलं आहे. नवीन टर्बो पेट्रोल इंजिनशिवाय या एसयूव्हीची आधीच्या 1.5 लिटर क्षमतेच्या पेट्रोल इंजिनमध्येही विक्री सुरू राहिल, हे कंपनीने स्पष्ट केले आहे.
-
कंपनीचा दावा आहे की, नवीन 'डस्टर टर्बो' मॅन्युअल व्हेरिअंटमध्ये 16.5 किलोमीटर आणि CVT व्हेरिअंटमध्ये 16.42 किलोमीटर प्रतिलीटर माइलेज देईल.
-
नवीन Duster मध्ये कंपनीने रिमोट प्री-कूलिंग फंक्शन दिलं आहे. याद्वारे एका रिमोटच्या माध्यमातून एसयूव्हीमध्ये बसण्याआधीच एअर कंडीशन (AC) आणि इंजिन स्टार्ट करता येते.
-
एसयूव्हीमध्ये मिडनाइट ब्लॅक कलरमध्ये इंटीरिअर दिलं आहे, त्यामुळे एसयूव्हीला नवीन आणि रिफ्रेश लूक आलं आहे. यामध्ये 7 इंचाचा ट्च स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे. ही सिस्टिम अॅपल कार-प्ले आणि अँड्राइड ऑटोला सपोर्ट करते.
-
कंपनीने नवीन डस्टरमध्ये सुरक्षेसाठीही अनेक फीचर्स दिले आहेत. यात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD), ड्युअल एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टिम यांसारखे फीचर्स आहेत. हे फीचर्स नवीन डस्टरच्या सर्व व्हेरिअंट्समध्ये असतील. याशिवाय रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ESP आणि हिल स्टार्ट असिस्ट यांसारखे फीचर्सही आहेत.
-
किंमत किती आणि क्रेटा व सेल्टॉसपेक्षा स्वस्त कशी? – ह्युंडाई क्रेटा आणि किआ Seltos या दोन एसयूव्हीच्या टर्बो पेट्रोल मॉडेलच्या तुलनेत नवीन टर्बो पेट्रोल मॉडेलमधील डस्टर जवळपास 5 लाख रुपयांनी स्वस्त आहे. तसं बघायला गेलं तर क्रेटाची बेसिक एक्स-शोरुम किंमत 9.99 लाख रुपये इतकी आहे. तर सेल्टॉसची बेसिक एक्स-शोरुम किंमत 9.89 लाख रुपये इतकी आहे. पण या दोन्ही एसयूव्हीच्या टर्बो पेट्रोल व्हेरिअंटसाठी तुम्हाला डस्टर टर्बोपेक्षा जवळपास पाच लाख रुपये जास्त मोजावे लागतात. कारण, ह्युंडाई क्रेटाच्या टर्बो पेट्रोल व्हेरिअंटची किंमत 16.17 लाख ते 17.21 लाख रुपयांदरम्यान आहे. तर, किया सेल्टॉसच्या टर्बो पेट्रोल व्हेरिअंटची किंमत 15.54 लाख ते 17.29 लाख रुपयांदरम्यान आहे. या दोन्ही एसयूव्हीच्या तुलनेत डस्टर टर्बोची बेसिक एक्स-शोरुम किंमत कंपनीने 10.49 लाख रुपये ठेवली आहे. म्हणजेच क्रेटा आणि सेल्चॉसच्या टर्बो मॉडेलपेक्षा डस्टर टर्बो पेट्रोल पाच लाखांनी स्वस्त आहे. जाणून घेऊया नवीन डस्टर टर्बो पेट्रोलच्या सर्व व्हेरिअंट्सची किंमत – (RXE – 10.49 लाख रुपये RXS – 11.39 लाख रुपये RXZ – 11.99 लाख रुपये, RXS(CVT) – 12.99 लाख रुपये, RXS(CVT) – 12.99 RXZ (CVT)13. 59 लाख रुपये. ) (सर्व फोटो – renault.co.in)

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…