-
लॉकडाउननंतर आता हळूहळू भारतातील ऑटो सेक्टरही पूर्वपदावर येत आहे. विक्री वाढवण्यासाठी कार कंपन्या आपल्या वाहनांवर भरघोस डिस्काउंट देत आहेत. जपानी कार निर्माता कंपनी Datsun ने देखील आपल्या गाड्यांवर एक धमाकेदार ऑफर आणली आहे. कंपनी आपली सर्वात स्वस्त एन्ट्री लेवलची हॅचबॅक कार redi-Go च्या खरेदीवर शानदार डिस्काउंट देत आहे. याशिवाय Datsun Go आणि Datsun Go+ MPV वरही बंपर डिस्काउंट आहे. या ऑफरशिवाय कंपनीकडून एका लकी ग्राहकाला कार खरेदीनंतर 100 टक्के कॅशबॅकचीही भन्नाट ऑफर मिळेल. 100 टक्के कॅशबॅकची ही ऑफर टेस्ट ड्राईव्ह आणि फीडबॅकनंतर कार बूक करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. आता सविस्तर जाणून घेऊया देशातील सर्वात स्वस्त फॅमिली कारचे फीचर्स आणि अखेरीस जाणून घेऊया कंपनी आपल्या वाहनांवर किती कॅश डिस्काउंट देत आहे आणि कंपनीने कोणती धमाकेदार ऑफर आणली आहे त्याबाबत.
-
भारतीय बाजारात 'हॅचबॅक' कारची डिमांड सर्वाधिक असते. कमी किंमत, लो मेंटेनन्स आणि उत्तम माइलेजमुळे या कार लवकर पसंतीस उतरतात. जुलै महिन्यातच Datsun कंपनीने भारतीय बाजारात आपली redi-GO नवीन अपडेटेड इंजिनसह लाँच केली. यासोबतच सध्या देशाच्या ऑटो मार्केटमध्ये असलेल्या कारपैकी 'Datsun Redi-GO फेसलिफ्ट' ही सर्वात स्वस्त छोटी फॅमिली कार ठरली आहे.
-
छोट्या फॅमिलीसाठी कमी किंमतीतील ही कार सध्या भारतीय बाजारातील सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे.
-
या कारमध्ये कंपनीने परवडणाऱ्या किंमतीत शानदार आणि आवश्यक सर्व फीचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे.
-
शानदार फीचर्ससह नवीन 'Datsun Redi-GO' चा माइलेजही उत्तम आहे.
-
आधीप्रमाणेच दोन इंजिन प्रकारात ही गाडी आली आहे.
-
कमी किंमतीमुळे मार्केटमध्ये या कारची थेट टक्कर मारुती ऑल्टो, रेनॉ क्विड आणि मारुति एस-प्रेसो यांसारख्या कारशी आहे.
-
कंपनीने ही कार चार व्हेरिअंटमध्ये (D, A, T, T(O))बाजारात उतरवली आहे.
-
जुन्या मॉडेलच्या तुलनेत नव्या कारच्या लूकमध्ये अनेक बदल झालेत. अपडेटेड redi-GO आधीपेक्षा जास्त बोल्ड आणि स्टाइलिश दिसतेय.
-
यामध्ये नवीन क्रोम-फिनिश ग्रिल, L-शेप एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि एलईडी फॉग लॅम्प दिले आहेत. स्मोक्ड हेडलाइट्स आणि मागे नवीन एलईडी टेललाइट्स व रूफ स्पॉइलर देण्यात आले आहेत. फ्रंट आणि रिअर बंपरच्या डिजाइनमध्येही बदल झाला आहे.
-
नवीन redi-GO च्या पुढील बाजूला नवीन L-शेप LED डे टाइम रनिंग लाइट्ससह रुंद आणि मोठे फ्रंट ग्रिल दिले आहेत. त्यामुळे कारचं फ्रंट लूक अधिक आकर्षक झालं आहे.
-
तर, कारच्या मागील बाजूला LED टेल लाइट्स आणि फॉक्स स्कीड प्लेट्स आहेत. त्यामुळे गाडीला स्पोर्टी लूक मिळालंय.
-
या कारमध्ये कंपनीने परवडणाऱ्या किंमतीत शानदार आणि आवश्यक सर्व फीचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे. यात अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्ले सपोर्टसह 8.0 इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, ब्लूटूथ, व्हिडिओ प्ले-बॅक , व्हॉइस रिकग्निशनचा समावेश आहे.
-
याशिवाय, रिअर पार्किंग कॅमरा, डिजिटल टेकोमीटर, ड्राइव्हर एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD)आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) व स्पीड अलर्ट सिस्टिम यांसारखे फीचर्स दिले आहेत.
-
नवीन redi-GO च्या पुढील बाजूला नवे L-शेप LED डे टाइम रनिंग लाइट्ससह रुंद आणि मोठे फ्रंट ग्रिल दिले आहेत. त्यामुळे कारचं फ्रंट लूक अधिक आकर्षक झालं आहे.
-
सुरक्षेसाठी या नवीन redi-GO कारमध्ये एबीएस, ईबीडी, ड्राइव्हर साइड एअरबॅग, रिअर डुअर चाइल्ड सेफ्टी लॉक, ड्राइव्हर-पॅसेंजर सीट बेल्ट रिमाइंडर, ओव्हर स्पीड वॉर्निंग, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आणि रिअर पार्किंग सेंसर्स हे फीचर्स आहेत.
-
तर, गाडीच्या टॉप मॉडेलमध्ये पॅसेंजर साइड एअरबॅग आणि प्रोजेक्शन गाइडसबोत रिव्हर्स पार्किंग कॅमेराही आहे.
-
ड्युअल-टोन कव्हर्ससह 14-इंचाचे व्हिल्स या गाडीला देण्यात आले आहेत.
-
कंपनीने नवीन कारच्या इंटीरिअरमध्येही बदल केला आहे. कारच्या कॅबिनला आधीपेक्षा जास्त प्रीमियम बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवीन रेडी-गोचं इंटीरिअर ब्लॅक कलरमध्ये आहे.
-
ही कार कंपनीने आधीप्रमाणेच दोन इंजिन प्रकारात आणली आहे. यात 0.8-लिटर आणि 1.0-लिटर पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. दोन्ही बीएस-6 इंजिन आहेत.
-
0.8-लिटर इंजिन 5,600 rpm वर 54 bhp पॉवर आणि 4,250 rpm वर 72 Nm टॉर्क निर्माण करतं. तर, 1.0-लिटर इंजिन 5,550 rpm वर 67 bhp पॉवर आणि 4,250 rpm वर 91 Nm टॉर्क निर्माण करतं. 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह हे दोन्ही इंजिन येतात. 1.0-लिटर इंजिनसह 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचा पर्यायही मिळेल.
-
नवीन दॅटसन रेडी-गोच्या 0.8-लिटर इंजिनचा माइलेज 20.71 किलोमीटर प्रतिलीटर आहे.
-
तर, 1.0-लिटर इंजिनचा माइलेज मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत 21.7 किलोमीटर आणि एएमटी गिअरबॉक्ससह 22 किलोमीटर प्रतिलीटर इतका आहे.
-
या 5-सीटर कारची एक्स-शोरुम किंमत या सेगमेंटमधील मारुती ऑल्टो, रेनॉ क्विड आणि मारुति एस-प्रेसोच्या किंमतीपेक्षा कमी आहे.
-
डिस्काउंट किती, काय आहे ऑफर आणि किंमत किती?- दॅटसन कंपनीने आपल्या वाहनांची विक्री वाढवण्याच्या हेतूने ऑगस्ट महिन्यात शानदार डिस्काउंटची ऑफर आणली आहे. ही ऑफर 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वैध असेल. या ऑफरनुसार कंपनी आपल्या Datsun Go या कारवर 55 हजार रुपये डिस्काउंट देत आहे. यामध्ये 20 हजार रुपये कॅश डिस्काउंट ग्राहकांना मिळेल. शिवाय या कारच्या खरेदीवर 20 हजार रुपये एक्स्चेंज डिस्काउंट आणि 10000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंटही मिळेल. तसेच फ्रंटलाइन वॉरियर्ससाठी (करोना योद्ध्यांसाठी) अतिरिक्त 5000 रुपये सवलतही आहे. म्हणजे एकूण 55 हजार रुपयांची सवलत ग्राहकांना ही कार खरेदी करताना मिळू शकते. तर, कंपनीची दुसरी कार Datsun Go+ MPV वरही 15000 रुपये कॅश डिस्काउंट आणि 20000 रुपये एक्स्चेंज डिस्काउंटची ऑफर आहे. कंपनीची सर्वात स्वस्त 'दॅटसन रेडी-गो' कारच्या खरेदीवरही कंपनीकडून 30 हजार रुपये डिस्काउंट मिळणार आहे. यात 15 हजार रुपये एक्सचेंज डिस्काउंट आणि 10000 रुपये लॉयल्टी डिस्काउंट मिळेल. या सर्व ऑफर्सव्यतिरिक्त डॅटसन किंवा निसानची कार खरेदी करणाऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत सोनं जिंकण्याचीही संधी आहे. यासाठी सप्टेंबरमध्ये लकी ड्रॉमधून एका नशिबवान विजेत्याची घोषणा केली जाईल. या ऑफरशिवाय कंपनीकडून एका लकी ग्राहकाला कार खरेदीनंतर 100 टक्के कॅशबॅकचीही भन्नाट ऑफर मिळेल. 100 टक्के कॅशबॅकची ही ऑफर टेस्ट ड्राईव्ह आणि फीडबॅकनंतर कार बूक करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. 'दॅटसन रेडी-गो'च्या बेसिक मॉडेलची एक्स-शोरुम किंमत 2.83 लाख रुपये आहे. तर, टॉप मॉडेलची किंमत 4.77 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. 0.8-लिटर इंजिनच्या चार व्हेरिअंटची (D, A, T, T(O))अनुक्रमे किंमत (एक्स-शोरुम) 2.83 लाख, 3.58 लाख, 3.80 लाख आणि 4.16 लाख रुपये आहे. तर, 1.0-लिटर इंजिन कारमध्ये केवळ T(O) हे एकच व्हेरिअंट आहे. 1.0-लिटर इंजिन- मॅन्युअल मॉडेलची एक्स-शोरुम किंमत 4.44 लाख आणि एएमटी मॉडेलची किंमत 4.77 लाख रुपये आहे. (सर्व फोटो सौजन्य-Datsun)

‘ज्वारीची भाकरी अन्…’, जिमला न जाता बोनी कपूर यांनी ६९ व्या वर्षी घटवलं २६ किलो वजन; फोटो पाहून चाहते झाले थक्क