-
देशाच्या ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये सध्या मंदीची स्थिती आहे. करोना संकट आणि लॉकडाउननंतर आता हळूहळू वाहनांची विक्री वाढायला सुरूवात झाली आहे. कारसोबतच टू व्हिलर्सच्या विक्रीवरही परिणाम झालाय. पण, जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये परिस्थितीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. जुलै महिन्यात टू-व्हिलर्सच्या विक्रीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. तरी गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यातील विक्रीच्या तुलनेत यावर्षी जुलै महिन्यात टू-व्हिलर्सची विक्री कमी आहे. जुलै महिन्यातील टू-व्हिलर्सच्या विक्रीच्या आकडेवारीनुसार जाणून घेऊया सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप-10 बाइक्स कोणत्या आहेत. विशेष म्हणजे टॉप-10 मध्ये एकाच कंपनीच्या चार बाइक्स आहेत.
-
10 – RE Classic 350 : जुलै महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या बाइक्सच्या यादीत दहाव्या क्रमांकावर रॉयल एनफिल्डची बुलेट Classic 350 आहे. जुलैमध्ये 25 हजार 534 Classic 350 बुलेट्सची विक्री झाली आहे. तर, गेल्या वर्षी याच महिन्यात 29 हजार 439 Classic 350 बुलेट्सची विक्री झाली होती.
-
9 – TVS Apache : या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर टीव्हीएसची Apache ही बाइक आहे. टीव्हीएस Apache च्या 33 हजार 664 युनिट्सची जुलैमध्ये विक्री झाली आहे.
-
8- Bajaj CT 100 : जुलै महिन्यात 33 हजार 774 युनिट्सची विक्री झाल्याने Bajaj CT 100 आठव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात 39 हजार 728 सीटी 100 ची विक्री झाली होती.
-
7- Bajaj Platina : सातव्या क्रमांकावर बजाजचीच प्लॅटिना ही बाइक आहे. जुलैमध्ये 35 हजार103 प्लॅटिना विकल्या गेल्या. तर गेल्या वर्षी जुलैमध्ये 52 हजार 489 प्लॅटिना बाइक्सची विक्री झाली होती.
-
6 – Hero Passion : जुलै महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या बाइक्सच्या यादीत हिरो मोटोकॉर्पची Hero Passion ही बाइक सहाव्या क्रमांकावर आहे. जुलैमध्ये 44 हजार 377 पॅशन गाड्या विकल्या गेल्या. गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या विक्रीपेक्षा हा आकडा जास्त आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये 43 हजार 439 पॅशनची विक्री झाली होती.
-
5- Hero Glamour : हिरो मोटोकॉर्पची Hero Glamour या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. पण जुलैमध्ये फक्त 51 हजार 225 ग्लॅमरची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात 71 हजार 160 ग्लॅमरची विक्री झाली होती.
-
4 – Bajaj Pulsar : चौथ्या क्रमांकावर बजाजची लोकप्रिय बाइक Bajaj Pulsar आहे. 73 हजार 836 पल्सर बाइकची या जुलै महिन्यात विक्री झाली आहे.
-
3 – Honda Shine : जुलै महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या बाइक्सच्या यादीत तिसरा क्रमांक होंडाच्या शाइन या बाइकचा लागतो. जुलैमध्ये 88 हजार 969 शाइन गाड्यांची विक्री झाली आहे. तर, गेल्या वर्षी जुलैमध्ये 94 हजार 559 शाइन विकल्या होत्या.
-
2- Hero HF : हिरो मोटोकॉर्पची HF Deluxe ही बाइक 1 लाख 54 हजार142 युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये 1 लाख 69 हजार 632 HF Deluxe ची विक्री झाली होती.
-
1- Hero Splendor : जुलैमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या बाइक्समध्ये अपेक्षेप्रमाणे पहिल्या क्रमांकावर हिरो मोटोकॉर्पची सर्वाधिक लोकप्रिय बाइक Hero Splendor आहे. जुलै महिन्यात 2 लाख 13 हजार 413 स्प्लेंडरची विक्री झाली आहे.

Mayuri Hagawane: “वैष्णवी गर्भवती असताना तिला…”, हगवणे कुटुंबाच्या छळाचा मोठ्या सुनेनं वाचला पाढा