-
‘पॉवरफुल बाइक’ अशी ओळख असलेल्या Bajaj Auto च्या Dominar 400 च्या किंमतीत बदल झाला आहे.
-
Bajaj Auto ने डॉमिनार 400 या बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने एप्रिल 2020 मध्ये कंपनीने ही बाइक नवीन BS6 इंजिनसह लाँच केली होती. तेव्हापासून दुसऱ्यांदा कंपनीने बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे.
-
Bajaj Dominar 400 एक 'टूरिंग-ओरिएंटेड' मोटरसायकल आहे. या बाइकवर रायडरला 'कम्फर्ट' आणि 'कमांडिंग' रायडिंग पोझिशन मिळते.
-
किंमत वाढवण्याशिवाय कंपनीने बाइकच्या फीचर्समध्ये अन्य कोणताही बदल केलेला नाही. या बाइकमध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत.बाइकमध्ये फुल LED लायटिंग, फ्युअल टँकवर लहान LCD आणि डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखे फीचर्स आहेत
-
बजाजच्या या पॉवरफुल बाइकमध्ये 373cc सिंगल सिलिंडर, लिक्विड कूल्ड मोटर इंजिन आहे. हे इंजिन 39.4bhp पॉवर आणि 35Nm पीक टॉर्क निर्माण करतं.
-
Bajaj Dominar 400 मध्ये साइड स्टँड पोझिशन ते सर्व्हिस रिमाइंडर, इंजिन किल स्विच ऑन/ऑफ, अॅव्हरेज फ्युअल एफिशिअन्सी यांसारखे फीचर्स आहेत. बाइकच्या पेट्रोलच्या टाकीजवळ गिअर पॉझिशन इंडिकेटर देण्यात आलं आहे. त्याच स्क्रिनवर ओडोमीटर आणि ट्रिप मीटरदेखील आहे.
-
187 किलोग्रॅम वजन असलेल्या या बाइकमध्ये 13 लिटर क्षमतेचा फ्युअल टँक आहे. बाइकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स मिळतील. बजाज डोमिनार 400 च्या फ्रंटला इन्वर्टेड फोर्क्स आणि रिअर मोनोशॉक सस्पेन्शन आहेत.
-
फक्त 7.1 सेकंदात ही बाइक 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग पकडते असा कंपनीचा दावा आहे.
-
भारतीय बाजारात बजाजच्या या बाइकची रॉयल एनफील्ड Himalayan, केटीएम 250 ड्युक आणि सुझुकी जिक्सर 250 यासारख्या बाइकसोबत टक्कर आहे .
-
नवीन किंमत : Bajaj Dominar 400 बाइकची एक्स-शोरुम किंमत यापूर्वी 1 लाख 94 हजार 751 रुपये होती. पण किंमतीत वाढ केल्याने आता या बाइकसाठी तुम्हाला 1 लाख 96 हजार 258 रुपये मोजावे लागणार आहेत. (सर्व फोटो : Bajaj Auto )

Asia Cup 2025: पाकिस्तानचा बहिष्कार! IND vs PAK सामन्याआधी PCB ने घेतला मोठा निर्णय