आशियातील सर्वात श्रीमंत दाम्पत्य म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची कायमच सोशल मीडियावर चर्चा असते. त्यांच्यासोबतच त्यांची मुलंदेखील कायम चर्चेत असतात. (सौजन्य : सर्व फोटो जनसत्ता) मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची लेक इशा अंबानी-पिरामल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. इशाकडे पाहिल्यानंतर साधी राहणी उच्च विचारसरणी याचा खऱ्या अर्थाने प्रत्यय येतो. शांत स्वभावाची असलेली इशा तिच्या आई-वडिलांचा कायम आदर करत असून त्यांच्या शब्दाबाहेर नाही असं सांगण्यात येतं. इशाला मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवायला, पार्टी करण्याची आवड असल्याचं पाहायला मिळतं. -
नीता अंबानी यांनी त्यांचे शूट, चप्पल एकदा वापरल्यानंतर पुन्हा वापरायला आवडत नाहीत. मात्र, इशा त्यांच्या एकदम विरुद्ध आहे. ती अनेकदा कपडे किंवा चप्पल रिपीट करते. इशाला दागिण्यांची प्रचंड हौस आहे. तिच्या लग्नात तिने अनेक महागडे आणि मौल्यवान दागिने परिधान केले होते. लक्झरी लाइफस्टाइल प्रमाणेच इशा तिच्या समाजकार्यासाठीदेखील चर्चेत असते. इशाने अनेक संस्थांना आर्थिक मदत केली आहे. खासकरुन मुली आणि लहान मुलांसाठी इशा कायम मदतीचा हात पुढे करत असते. २०१८ साली इशाने प्रसिद्ध उद्योगपती आनंद पिरामल यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL